Mercedes-Benz च्या आलिशान कार खूप स्वस्त होणार; कंपनीने केली तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 04:09 PM2021-10-21T16:09:11+5:302021-10-21T16:09:26+5:30

Mercedes-Benz car become cheaper: मर्सिडीजचा पुण्यातील चाकणमध्ये प्लांट आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून तिथे कार बनविल्या जातात. मात्र बॉडी वगळता बाकी सारे बाहेरून आयात केले जाते.

Mercedes-Benz's luxury car will be cheaper by 20 percent; will start assemble in Pune | Mercedes-Benz च्या आलिशान कार खूप स्वस्त होणार; कंपनीने केली तयारी...

Mercedes-Benz च्या आलिशान कार खूप स्वस्त होणार; कंपनीने केली तयारी...

googlenewsNext

जर्मनीची लक्झरी कार बनविणारी कंपनी Mercedes-Benz च्या कार या महागड्याच असतात. पण आता त्या खूप स्वस्त होणार आहेत. कंपनीने मर्सिडिज कार 20 टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्याची तयारी केली आहे. 

मर्सिडीजचा पुण्यातील चाकणमध्ये प्लांट आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून तिथे कार बनविल्या जातात. मात्र बॉडी वगळता बाकी सारे बाहेरून आयात केले जाते. यामुळे Mercedes-Benz च्या कारवर 110 टक्के कर लागतो. भारत हा जगातील सर्वाधिक आयात कर वसूल करणार देश आहे. बाहेरून आयात केल्या जाण्याऱ्या कारवर 110 टक्के म्हणजे जवळपास दुप्पट कर आकारला जातो. यामुळे परदेशातील वस्तू महाग असतात. 

मर्सिडिजने आता भारतातच कार असेम्बल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्य कंपनी भारतात 9 मॉडेस असेम्बल करते. यामध्ये A35 आणि GLC43 Coupe देखील आहेत. परंतू आता साऱ्याच कार, बस आदी चाकणमध्येच तयार करण्यात येणार आहेत. 

Mercedes-Benz येत्या काळात AMG कारची असेम्ब्ली पुण्यात करणार आहे. यासाठी कंपनीने पुण्यात असेम्ब्ली लाईन बसविली आहे. मेक इन इंडिया कार अद्याप दूर असल्या तरी देखील कार इथेच जोडण्यात येणार असल्याने खर्च कमी होईल याचा फायदा म्हणजे कार 18 ते 20 टक्के स्वस्त होतील. 

Mercedes-Benz 2025 पर्यंत आपल्या सर्व गाड्या इलेक्ट्रीक करणार आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलमध्ये कार बनविणे कंपनी बंद करणार आहे. या इलेक्ट्रीक गा़ड्यादेखील भारतातच बनविण्यात येणार आहेत. 

Web Title: Mercedes-Benz's luxury car will be cheaper by 20 percent; will start assemble in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.