अध्यापक महाविद्यालय परिसरात एनसीसीचे मुख्य कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:05 AM2021-05-06T04:05:32+5:302021-05-06T04:05:32+5:30

औरंगाबाद : शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या परिसरात एन.सी.सी.चे समूह मुख्य कार्यालय (ग्रुप एच.क्यू.) होणार असून, प्रौढ निरंतर शिक्षण संस्थेच्या इमारतीत ...

Head office of NCC in Teachers College premises | अध्यापक महाविद्यालय परिसरात एनसीसीचे मुख्य कार्यालय

अध्यापक महाविद्यालय परिसरात एनसीसीचे मुख्य कार्यालय

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या परिसरात एन.सी.सी.चे समूह मुख्य कार्यालय (ग्रुप एच.क्यू.) होणार असून, प्रौढ निरंतर शिक्षण संस्थेच्या इमारतीत ५० व ५१ बटालियन, तर विभागीय क्रीडा संकुल येथे ७ - गर्ल्स कार्यालयासाठी ही जागा हस्तांतरित करण्यासंबंधी प्रस्तावित केले आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या.

शासकीय अध्यापक महाविद्यालय यांचे वापरात नसलेले सभागृह, तसेच विभागीय क्रीडा संकुल येथील इमारतीतील काही भाग एन.सी.सी. (नॅशनल कॅडेट कोर)च्या कार्यालयासाठी हस्तांतरित करण्याकरिता प्रस्तावित केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय, प्रौढ निरंतरची इमारत, विभागीय क्रीडा संकुल येथील बुधवारी पाहणी केली. महाराष्ट्र प्रौढ निरंतर शिक्षण संस्थेची इमारत आणि विभागीय क्रीडा संकुल येथील उपलब्ध जागा, बांधकामाची स्थिती, कामाचा नकाशांची माहिती यावेळी संबंधितांनी दिली.

ब्रिगेडियर एम. एम. विटेकर, लेफ्टनंट कर्नल अभिजित बर्वे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार रतनसिंग साळोके, क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या संजीवनी मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक येरेकर, शाखा अभियंता प्रीती मोरे यांची उपस्थिती होती.

Web Title: Head office of NCC in Teachers College premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.