Smriti Khanna and Gautam Gupta share first photo of their daughter PSC
सीआयडी फेम स्मृती खन्नाने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा फोटो, दिसते खूपच गोंडस By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:10 PM2020-05-07T16:10:25+5:302020-05-07T16:10:25+5:30Join usJoin usNext मेरी आशिकी तुम से ही फेम स्मृती खन्ना काही दिवसांपूर्वी आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्मृतीने काही दिवसांपूर्वी मुलीसोबतचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत स्मृतीने बाळाला कुशीत घेतले होते तर बाजूला गौतम बसलेला दिसत होता. स्मृतीने आता तिच्या मुलीचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात आपल्याला तिचा चेहरा पूर्णपणे दिसत आहे. स्मृती आणि गौतमची मुलगी खूपच क्यूट असून सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांच्या मुलीच्या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. स्मृती आणि गौतमने त्यांच्या या चिमुरडीचे नाव अयंका ठेवले असून सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना याविषयी सांगितले आहे. स्मृती आणि गौतम सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून ते त्यांच्या मुलीचे अनेक फोटो पोस्ट करत आहेत. स्मृती गरोदर असताना देखील तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. टॅग्स :टेलिव्हिजनTelevision