मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून अनलॉक; शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 06:44 AM2021-09-30T06:44:27+5:302021-09-30T06:45:09+5:30

पालिका शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी

Schools in Mumbai also unlocked from October 4 commissioner agrees pdc | मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून अनलॉक; शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी

विलेपार्ले येथील माधवराव भागवत हायस्कूलमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. (छाया : दत्ता खेडेकर)

Next
ठळक मुद्देपालिका शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी

मुंबई : अखेर मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शहरातील महापालिका शाळा, खासगी व्यवस्थापन, इतर मंडळांच्या शाळांना ८वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे.

मुंबई क्षेत्रातील शाळा सुरू करण्याआधी शाळांनी योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे, असे निर्देश पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. याशिवाय शाळा सुरु करण्याआधी व केल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही शाळा व्यवस्थापनांना करण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहायक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडिअम हायपोक्लोराइड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. 

खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी आपल्या स्तरावर निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना पालिका शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ज्या शाळा आतापर्यंत कोविड १९चे केंद्र, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र म्हणून वापरात आहेत, त्यांचे स्थलांतर करून शाळा वापरण्यायोग्य स्थितीत आणण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत.

शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना
कोविड सेंटर, रेल्वे स्थानकात लसीकरण केंद्रात, प्रमाणपत्रे पडताळणी तसेच निवडणूक कामांसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांनाही कार्यमुक्त करावे, असे निर्देश तडवी यांनी दिले आहेत. महापालिकेच्या आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी जवळच्या महापालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्राशी शाळा संलग्न करण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

पालिका शाळांची पूर्वतयारी झाली 

  • शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थीसंख्या पाहून वर्ग एका दिवसाआड भरवायचे की कसे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. 
  • दरम्यान, राज्य शासनाच्या एका बाकावर एक विद्यार्थी, प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग, हात धुण्यासाठी मुबलक पाणी अशा सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल अशी माहिती तडवी यांनी दिली. 
  • प्रत्येक विद्यार्थी शाळॆत जसजसा उपस्थित होईल तसे त्याला त्यांच्या वर्गशिक्षक, शाळा प्रशासनाकडून मास्क वाटपाची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, शाळा सुरु होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र बंधनकारक असणार आहे.

Read in English

Web Title: Schools in Mumbai also unlocked from October 4 commissioner agrees pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.