...अखेर प्रवाशांच्या मागणीला यश; पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:48 PM2021-10-13T17:48:59+5:302021-10-13T17:49:07+5:30

रेल्वे प्रशासन (railway government) पुणे - मुंबई दरम्यान १८ ऑक्टोबर पासून सिंहगड एक्सप्रेस सुरु करीत आहे

finally success in passenger demand pune - mumbai Sinhagad Express will run | ...अखेर प्रवाशांच्या मागणीला यश; पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस धावणार

...अखेर प्रवाशांच्या मागणीला यश; पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस धावणार

googlenewsNext

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी आता पूर्ण होत आहे. रेल्वे प्रशासन (railway government) पुणे - मुंबई दरम्यान १८ ऑक्टोबर पासून सिंहगड एक्सप्रेस (sinhagad express) सुरु करीत आहे.

ही गाडी पुणे स्थानकावरून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघेल. मुंबईला ९ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल. मुंबई हुन संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल पुण्याला रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल. गाडीला शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर व सीएसएमटी या स्थानकांवर थांबा देण्यात आला. प्रवाशांना लवकरच आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने देहूरोड व तळेगाव आदी स्थानकावर देखील गाडीला थांबा द्यावा हि मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.  

Web Title: finally success in passenger demand pune - mumbai Sinhagad Express will run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.