सारखं मोबाईल घेऊ नकोस, आई ओरडली; १० वीच्या मुलीनं अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 10:46 AM2021-09-25T10:46:30+5:302021-09-25T10:52:14+5:30

मृत विद्यार्थिनीचं नाव रुबीना खातून असं आहे. ती १५ वर्षाची होती. कोलकातामधील इकबालपूर परिसरातील शाळेत ती शिकण्यासाठी होती.

A 10th standard girl threw kerosene on her body and set herself on fire due to Mobile | सारखं मोबाईल घेऊ नकोस, आई ओरडली; १० वीच्या मुलीनं अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं

सारखं मोबाईल घेऊ नकोस, आई ओरडली; १० वीच्या मुलीनं अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना महामारीमुळे शाळा बंद होत्या तेव्हा ती तिच्या आईकडे हुगलीला आली होती. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे मोबाईल फोनवरच ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.जेव्हा तिची आई सबीना खातून हिने मुलीच्या या सवयीकडे पाहिलं तर तिने मुलीला मोबाईलची सवय सोडण्याचा आग्रह केला.

हुगली – सध्याच्या युगात मोबाईल हा अनेकांच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. मोबाईलशिवाय जगणं कठीण असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. परंतु मोबाईलसाठी कुणी जीव देईल ही कल्पनाही करु शकत नाही. मोबाईलच्या सवयीमुळे दहावीतील विद्यार्थिनी इतकी वेडी झाली होती की जेव्हा आईने तिला मोबाईल घेण्यापासून रोखलं तेव्हा तिने स्वत:चा जीव दिला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. ही ह्दयद्रावक घटना हुगली जिल्ह्यातील पांडुआ श्रीपाला गावातील आहे.

मृत विद्यार्थिनीचं नाव रुबीना खातून असं आहे. ती १५ वर्षाची होती. कोलकातामधील इकबालपूर परिसरातील शाळेत ती शिकण्यासाठी होती. इकबालपूर परिसरात ती मावशीच्या घरी राहायला होती. कोरोना महामारीमुळे शाळा बंद होत्या तेव्हा ती तिच्या आईकडे हुगलीला आली होती. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे मोबाईल फोनवरच ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु मोबाईल फोनची सवय इतकी जडली होती की मोबाईल तिच्या आयुष्याचा एक भाग बनला होता. मोबाईलवर व्हिडीओ गेम खेळणे, अधिकाधिक वेळ मित्रमैत्रिणींसोबत चॅटिंग करणं यात ती वेळ घालवत होती.

जेव्हा तिची आई सबीना खातून हिने मुलीच्या या सवयीकडे पाहिलं तर तिने मुलीला मोबाईलची सवय सोडण्याचा आग्रह केला. तिने नाही ऐकलं म्हणून आई तिला खूप ओरडली. त्यामुळे नाराज झालेल्या मुलीनं स्वत:ला रुममध्ये कोंडून घेतलं आणि त्यानंतर जे काही केले ते ऐकून सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रुममध्ये मुलीने आतमधून दरवाजा बंद केला होता आणि आतमध्ये अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरातील इतर सदस्य झोपले होते. सकाळी उठल्यानंतर मुलीने दरवाजा उघडला नाही म्हणून तिला आवाज दिला परंतु काहीच उत्तर आलं नाही. त्यानंतर खिडकीमधून आतमध्ये पाहिलं तेव्हा मुलगी जमिनीवर पडल्याचं दिसलं. तेव्हा आईने हंबरडा फोडला. घरातील इतर सदस्य आणि शेजारील लोकं जमा झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

सुसाईड नोटमध्ये मुलीनं लिहिलं होतं आत्महत्येचं कारण

हुगली ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त ऐश्वर्या सागरने सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला. मोबाईल फोनच्या सवयीमुळे घरात वाद सुरु होता. पोलिसांना मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोट आढळली त्यात मुलीनं लिहिलंय की, मोबाईल फोनची सवय मोडण्यासाठी आई वारंवार मला ओरडत होती. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. सध्या पोलीस पोस्टमोर्टम रिपोर्टची वाट पाहत आहे.

Web Title: A 10th standard girl threw kerosene on her body and set herself on fire due to Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल