'या' कारणांमुळे डायबिटीसच्या रुग्णांचे वजन कमी होणं आहे अत्यंत कठीण, जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:30 PM2021-09-28T17:30:49+5:302021-09-28T17:31:32+5:30

डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी वजन कमी करणे थोडे अधिक कठीण काम आहे. त्याची कारणे खालीलप्रमाणे...

weigh loss for diabetes, three reasons why diabetes patient find difficult to loose weight | 'या' कारणांमुळे डायबिटीसच्या रुग्णांचे वजन कमी होणं आहे अत्यंत कठीण, जाणून घ्या उपाय

'या' कारणांमुळे डायबिटीसच्या रुग्णांचे वजन कमी होणं आहे अत्यंत कठीण, जाणून घ्या उपाय

googlenewsNext

डायबिटीस असलेल्या लोकांना दिला जाणारा पहिला सल्ला म्हणजे वजन कमी करणे. निरोगी बीएमआय आणि निरोगी वजन डायबिटीस नियंत्रण ठेवण्यासाठी खूप चांगले आहे. मात्र, डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी वजन कमी करणे थोडे अधिक कठीण काम आहे. त्याची कारणे खालीलप्रमाणे...

इन्सुलिन रेसिस्टेंस
कर्बोदकांनी समृद्ध असलेले अन्न रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. इन्सुलिनचा स्वादुपिंडातून स्त्राव होतो. ज्यामुळे ग्लुकोज रक्ताच्या बाहेर आणि पेशींमध्ये जाण्यास मदत होते. जिथे ते ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. टाइप २ डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये ही प्रक्रिया योग्यरित्या कार्य करत नाही. त्यांचे शरीर इन्सुलिनच्या क्रियेला प्रतिरोधक बनते आणि अशा प्रकारे रक्तातील ग्लुकोज काढून टाकण्यासाठी इन्सुलिन तितके प्रभावी होत नाहीत.

रक्तातील साखर कमी करण्यासाठी, शरीर अधिक इन्सुलिन बनवते. इन्सुलिनचे आणखी एक कार्य म्हणजे चरबी साठवणे. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना वजन कमी करणे कठीण होते.

भूक लागणे
डायबिटीसने ग्रस्त लोकांना आहाराशी संबंधित अनेक सल्ले दिले जातात जसे की त्यांच्या कॅलरीज नियंत्रित करणे, कार्बचे सेवन कमी करणे आणि जेवण कमी करणे. कधीकधी या सल्ल्याचे पालन करताना त्यांना उलट अधिक भूक लागते. परिणामी त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कार्बयुक्त आहारामुळे रक्तातील साखरेमध्ये वाढ होते. ज्यामुळे वजन वाढते.

डायबिटीसचे औषध
डायबिटीससाठी इन्सुलिन औषध म्हणून दिले जाते परंत इन्सुलिन चरबी साठवण्यास मदत करते. इन्सुलिन घेतल्याने वजन वाढू शकते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करणे. तसेच मधुमेहाच्या रूग्णाने कोणताही डाएट करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: weigh loss for diabetes, three reasons why diabetes patient find difficult to loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.