Hardik Pandya च्या कडेवर दिसला अगस्त्यचा छोटा भाऊ! चाहते गेले गोंधळून.. जाणून घ्या नक्की प्रकरण काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:44 IST2022-08-22T16:39:37+5:302022-08-22T16:44:24+5:30

अगस्त्य हे हार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव आहे.

Hardik Pandya Viral Photo with Baby: टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. सुरूवातीला त्याने गुजरात संघाला IPLची ट्रॉफी मिळवून दिल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यानंतर टीम इंडियात कमबॅक केल्यानंतरही त्याने दमदार कामगिरी करून दाखवली.

टीम इंडियात परतल्यावर हार्दिकने पाच ते सहा मालिका खेळल्या. त्यानंतर मिळालेल्या विश्रांतीच्या काळात हार्दिक आपल्या कुटुंबासोबत ग्रीसला समुद्रकिनारी सुटी एन्जॉय करताना दिसला. हार्दिक-नताशा यांचे काही हॉट रोमँटिक फोटोज् भरपूर व्हायरल झाले. नताशाचा बिकीनी लूक आणि हार्दिकचा फिटनेस चाहत्यांना खूप आवडला.

हार्दिक-नताशा आणि त्यांचा मुलगा अगस्त्य यांचे अनेक फोटोज सोशल मीडियावर पोस्ट झाले आणि त्याला चाहत्यांचे प्रेम मिळाले. पण आज हार्दिकने एका लहान बाळाला कडेवर उचलून घेतल्याचा फोटो पोस्ट करत हा 'अगस्त्यचा लहान भाऊ आहे' असं सांगितले. त्यानंतर गोंधळलेल्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले, पण चाहत्यांना घोळ लक्षात आला. पाहा नक्की काय झालं..

हार्दिक पांड्याने आपल्या मुलासोबत (अगस्त्य) अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच हार्दिकने गेल्या ८-१० दिवसात नताशाचे अनेक फोटो पोस्ट केले असून ती गरोदर नसल्याची चाहत्यांना कल्पना होती. त्यामुळे चाहते पुरते गोंधळून गेले.

चाहत्यांचा गोंधळ वाढण्यासाठी हार्दिकचे फोटोसोबतचे कॅप्शनदेखील कारणीभूत ठरले. त्याच्या कडेवरील बाळ हे अगस्त्यचा छोटा भाऊ 'कवीर' आहे आणि आता अगस्त्यला मोठ्या भावाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत, असे हार्दिकने लिहिले. त्यामुळे हार्दिकच्या कडेवर असलेले फोटोमधील बाळ नक्की कोणाचे? असा प्रश्न चाहत्यांना पडला.

पण पुढच्याच फोटोत त्याचा उलगडा झाला. काही दिवसांपूर्वीच हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या याची त्याची पत्नी पंखुरी हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. हार्दिकने पुढच्या फोटोत पंखुरीलाही समाविष्ट करून घेतल्याने चाहत्यांचा गोंधळ दूर झाला. आधी क्रिकेट आणि नंतर ग्रीसमधील सुट्टीच्या निमित्ताने हार्दिक घराबाहेरच होता. आज तो घरी परतल्यानंतर त्याने आपल्या पुतण्याला कडेवर घेत फोटो काढला.

whatsapp-join-us-banner