अंत्यविधीला निघालेल्या गाडीची ट्रकला जोरदार धडक, 18 जणांचा जागीच मृत्यू; अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 12:46 PM2021-11-28T12:46:30+5:302021-11-28T12:46:42+5:30

मृतांमध्ये 10 पुरुष आणि एका चिमुकलीसह 8 महिलांचा समावेश.

18 died on the spot and Several seriously injured in accident in Nadiya, West Bengal | अंत्यविधीला निघालेल्या गाडीची ट्रकला जोरदार धडक, 18 जणांचा जागीच मृत्यू; अनेक गंभीर जखमी

अंत्यविधीला निघालेल्या गाडीची ट्रकला जोरदार धडक, 18 जणांचा जागीच मृत्यू; अनेक गंभीर जखमी

Next

कोलकाता:पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर 24 परगणामधील बगदा येथून 20 हून अधिक लोक मृतदेह घेऊन मॅटाडोरमधून नवद्वीप स्मशानभूमीकडे जात असताना शनिवारी ही घटना घडली. यादरम्यान, गाडी फुलबारी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात वाहन चालकासह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 10 पुरुष आणि 7 महिला आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. उत्तर 24 परगणा येथील बगदा पोलीस स्टेशन हद्दीतील परमदान भागात राहणारी वृद्ध महिला श्राबानी मुहुरी हिचा मृत्यू झाला होता, तिच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंब आणि शेजाऱ्यांसह 20 लोक मॅटाडोरमधून नवद्वीपला जात होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नादियातील फुलबारी क्रीडांगणाजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या मागून मॅटाडोरने धडक दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे

 


पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 

Web Title: 18 died on the spot and Several seriously injured in accident in Nadiya, West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.