कराड विरुद्ध धस थेट सामना, मुंडेंची उपस्थिती; चर्चा निलंगेकरांची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 08:29 PM2018-05-03T20:29:50+5:302018-05-03T20:30:09+5:30

उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद मतदारसंघात शेवटच्या क्षणी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी घोषित झाल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड विरुद्ध भाजपाचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस असा सामना रंगणार आहे.

Direct match against Karad, Mundane's presence; Talk about Nilangekar | कराड विरुद्ध धस थेट सामना, मुंडेंची उपस्थिती; चर्चा निलंगेकरांची

कराड विरुद्ध धस थेट सामना, मुंडेंची उपस्थिती; चर्चा निलंगेकरांची

googlenewsNext

- चेतन धनुरे
उस्मानाबाद : उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद मतदारसंघात शेवटच्या क्षणी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी घोषित झाल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड विरुद्ध भाजपाचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस असा सामना रंगणार आहे. एकूण १००६ मतदारांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित संख्याबळ ५२७ आहे. मात्र कागदावरील आकड्यांचा मेळ प्रत्यक्ष निवडणुकीत कसा बसविला जाईल, यावर पुढचे चित्र असणार आहे.
महायुतीत ही जागा भाजपाला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव भाजपात प्रवेश करण्यापूर्वीच उमेदवार म्हणून जाहीर झाले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश कराड यांना पक्षप्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. मात्र तोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झालेला नसल्यामुळे अंबाजोगाई येथील काँग्रेस नेते राजकिशोर मोदी यांचा अर्ज शेवटच्या दिवशी दाखल होणार होता. त्यासाठी आमदार अमरनाथ राजूरकर एबी फॉर्मसह उस्मानाबादेत दाखलही झाले. पावणेदोनच्या सुमारास आघाडीचा निरोप आला. दरम्यान, राष्ट्रवादीतून उमेदवारीची अपेक्षा असणारे उद्योजक अशोक जगदाळे यांनी बंडाचे निशाण फडकावीत अर्ज दाखल केला आहे. याशिवाय इतर पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या स्थितीतही आघाडीविरुद्ध महायुती, असाच सामना होईल.
संख्याबळाचा खेळ...
एकूण १००६ मतदार, त्यात काकू-नाना आघाडीसह राष्ट्रवादीकडे जवळपास ३३६, काँग्रेसकडे १९१ तर भाजपा ३०२, शिवसेना ६५, एमआयएम २०, तर अपक्षांचे संख्याबळ ९२ इतके आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने एकत्रित संख्याबळ ५२७ तर महायुतीचे ३६७ आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नळदुर्ग परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीचे सुमारे ३० मतदार कमी होतील, असे गृहित धरले जाते. तरीही आघाडीचे ह्यघड्याळह्ण चालणार की ह्यकमळह्ण फुलणार? हे प्रचारादरम्यान कळेल.
महायुतीच्या घटक पक्षांची पाठ...
महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांची उमेदवारी दाखल करताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. मात्र कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर अनुपस्थित राहिले. शिवाय, सेनेसह घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीही अनुपस्थिती स्पष्ट दिसत होती. यावर पंकजा मुंडे यांनी प्रचारात सर्वजण दिसतील व मंत्री निलंगेकर हे नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर असल्याचे सांगितले. याउपरही मंत्री निलंगेकर यांच्या बंधूस उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याचीही चर्चा रंगत होती.
उस्मानाबाद व परभणीत आघाडी मजबूत...
उस्मानाबाद-बीड-लातूर तसेच परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार. परभणीमध्ये काँग्रेस तर उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी, अशी बोलणी झाली असून, सभागृहातील संख्याबळ कायम ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष एकजुटीने काम करतील, असा विश्वास काँग्रेसचे आ. अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Direct match against Karad, Mundane's presence; Talk about Nilangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.