चॅलेजिंग होतं कोर्टरूम ड्रामा रुपेरी पडद्यावर साकारणं - अजय बहल

By तेजल गावडे | Published: September 10, 2019 06:00 AM2019-09-10T06:00:00+5:302019-09-10T06:00:00+5:30

अक्षय खन्ना व रिचा चड्ढा अभिनीत 'सेक्शन ३७५' चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केलं आहे.

Challenging the courtroom drama was done on the silver screen - Ajay Bahl | चॅलेजिंग होतं कोर्टरूम ड्रामा रुपेरी पडद्यावर साकारणं - अजय बहल

चॅलेजिंग होतं कोर्टरूम ड्रामा रुपेरी पडद्यावर साकारणं - अजय बहल

googlenewsNext

अक्षय खन्ना व रिचा चड्ढा अभिनीत 'सेक्शन ३७५' चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केलं आहे. या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...

- तेजल गावडे

'सेक्शन ३७५'वर चित्रपट बनवावासा का वाटला?
'सेक्शन ३७५' चित्रपटाची स्क्रीप्ट लेखक मनीष गुप्ता यांनी लिहिलेली होती. ती स्क्रीप्ट मला चांगली वाटली. त्यामुळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं ठरविले. 
अक्षय खन्ना व रिचा चड्ढाने चित्रपट आधीच साईन केला होता. 'सेक्शन ३७५'ची बऱ्याचदा समाजात चर्चा होताना पहायला मिळते. त्यामुळे मनोरंजनासोबत लोकांना त्यातून काही माहिती मिळणार असेल, तर ही चांगली बाब आहे.  

या चित्रपटाचा अनुभव कसा होता?
खूपच चांगला अनुभव होता. चित्रपटाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये खूप मजा आली. स्क्रीप्ट तयार होती पण सुरूवातीला कोणताही दिग्दर्शक त्याच्या दृष्टीकोनातून स्क्रीप्टमध्ये थोडाफार बदल करतो. त्यामुळे मला चार-पाच महिने स्क्रीप्ट लिहण्यासाठी वेळ गेला. त्यानंतर जानेवारीपासून चित्रीकरणाला सुरूवात केली.


 
कोर्टरुम ड्रामा रुपेरी पडद्यावर रेखाटणं चॅलेजिंग वाटतं का?
जर प्रकरण इंटरेस्टिंग असेल तर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं असतं. दोन्ही बाजू स्ट्राँग असेल तर निकाल काय लागणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. ७० टक्के जर एकाच ठिकाणी शूट असेल तर व्हिज्युअली इंटरेस्टिंग बनवावा लागतो. सारखे सारखे तेच शॉट दाखवून चालत नाही. वेगळे शॉट्स घ्यावे लागतात. कारण प्रेक्षक व्हिज्युअली कंटाळले नाही पाहिजेत. कोर्टरुम ड्रामासारख्या चित्रपटात या गोष्टी चॅलेजिंग असतात. 

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगाल?
हा सिनेमा कोणा एकाची बाजू घेत नाही आहे. ८-९ प्रकरणाचा या चित्रपटासाठी थोडाफार संदर्भ घेण्यात आला आहे. कायद्यासोबतच न्यायालयीन प्रक्रियाही चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. बऱ्याच लोकांना बलात्काराचे मायने माहित नाही. निर्भया केसनंतर 'सेक्शन ३७५'मध्ये बदल करण्यात आला. या संदर्भातील बऱ्याच गोष्टी चित्रपटात पहायला मिळणार आहेत. 
 

Web Title: Challenging the courtroom drama was done on the silver screen - Ajay Bahl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.