केंद्रीय समितीच्या सदस्याला लोक भुरटा चोर समजले; खामगावात मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:03 PM2022-05-20T13:03:10+5:302022-05-20T13:03:23+5:30

सकळकळे कॉम्पलेक्स परिसरातील घटना; मारहाणीची शहर पोलिसांत तक्रार

The member of the Central Committee was considered a thief by the people; beaten in Khamgaon | केंद्रीय समितीच्या सदस्याला लोक भुरटा चोर समजले; खामगावात मारहाण

केंद्रीय समितीच्या सदस्याला लोक भुरटा चोर समजले; खामगावात मारहाण

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: केंद्रीय कचरा मुक्त समितीच्या एका सदस्याला चक्क भुरटा चोर समजून मुख्य वस्तीतील सकळकळे कॉम्पलेक्स परिसरात मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली असून घडलेल्या घटनेची शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. तर  सदस्यांसोबत असलेल्या पालिकेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची चर्चा आहे.

स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीसाठी कचरा मुक्त समितीचे केंद्रीय पथक विविध पालिकांना भेटी देत आहे. खामगाव शहरातील स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीसाठी  खामगावात दिल्ली येथील एक पाच सदस्यीय पथक दाखल झाले. सदस्यांकडून झोन निहाय पाहणी सुरू असतानाच मुख्य वस्तीतील सकळकळे कॉम्पलेक्स नजीक एका सदस्याला चक्क  भुरटा चोर समजून मारहाण करण्यात आली. या प्रकाराने भांबावलेले पालिका अधिकारी आणि कर्मचाºयांनी घटनास्थळावरून अक्षरक्ष: पळ काढल्याची चर्चा आहे. या प्रकाराला पालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांनी दुजोरा दिलाय. त्याचवेळी घटनास्थळावरून अधिकारी, कर्मचाºयांनी पळ काढल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. याप्रकरणी संबंधितांविरोधात पालिकाप्रशासनाकडून पोलीसात तक्रार करण्यात आली आहे. शहर पोलीसांनी हे प्रकरण चौकशीवर ठेवले आहे.

दोन कानशीलात लगावल्या!
- केंद्रीय कचरा मुक्त समितीचे सदस्य डेटा संकलनासाठी फोटोग्राफी करीत होते. त्यावेळी  कॉम्पलेक्समधील एका इसमाने खिडकीतून हा सर्व प्रकार पाहीला. कोणतीही शहनिशा न करताच केंद्रीय समितीच्या सदस्यावर हल्ला चढविला. हा प्रकार पाहून काहींनी घटनास्थळावरून पळ काढला. तर काहींनी वाद आवरण्यास मदत केली. पंरतु तत्पूर्वीच संबंधितांनी सदस्याच्या दोन कानशिलात लगावल्या.

डम्पींग ग्रांऊडचीही पाहणी
- शहरातील सार्वजनिक शौचालय, उकीरडे तसेच कचरा टाकल्या जाणाºया ठिकांणांची पाहणी आणि तपासणी कचरा मुक्त शहर समिती कडून केली जात आहे. त्याचवेळी शहरातील डम्पींग ग्रांऊडचीही तपासणी या पथकाकडून करण्यात आली.

शिवाजी वेस भागातही वाद
- कचºयाचे स्थळ पाहण्यासाठी पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांकडून इन्कार करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शिवाजी वेस भागात केंद्रीय कचरा मुक्त समिती सदस्यांच्या समोरच पालिकेचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शिवाजी वेस भागात वाद झाला. परिणामी, खामगावात समितीचे दोन्ही दिवस वादाचे ठरल्याची चर्चा आहे.

Web Title: The member of the Central Committee was considered a thief by the people; beaten in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.