वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:57 AM2019-09-10T01:57:52+5:302019-09-10T01:58:09+5:30

आमची ताकद आम्ही दाखवून देणार

RSS congregation in the underprivileged !; Jalil's accusation | वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

googlenewsNext

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निगडित माणसे शिरली आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’सोबतची युती तोडली, असा खळबळजनक आरोप खा. इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. आम्हाला फक्त ८ जागा देण्यात आल्या. दोन महिने आमच्यासोबत चर्चेचे गुºहाळ सुरू होते. दुसरीकडे काँग्रेससोबतही बोलणी सुरू ठेवली. आम्ही आता स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत, असेही जलील यांनी जाहीर केले.

पत्रकार परिषदेत जलील यांनी मागील दोन महिन्यांत एमआयएम आणि वंचितमध्ये जागा वाटपासाठी कशी चर्चा झाली याची माहिती दिली. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर दोघेच चर्चा करीत होते. त्यांच्या सूचनांवरून आम्ही अगोदर ९८ व नंतर ७४ जागांची यादी वंचितला दिली. परंतु आम्हाला फक्त ८ जागा देण्यात आल्या. वंचितने आम्हाला किमान ४० ते ५० जागा दिल्या पाहिजेत. आमच्याकडे व्होट बँक नाही, असे वारंवार सांगण्यात येत आहे. राज्यात आमचे १५० नगरसेवक आहेत. आमची व्होट बँक किती हे विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा इशाराही जलील यांनी दिला.

मुळात सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वेगळी आघाडी तयार करण्यासाठी एमआयएम-वंचित बहुजन एकत्र आले. वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डातील सदस्य आपली स्वत:ची ओळख मला करून देताना म्हणाले की, माझ्यामागे दोन कोटी लोक आहेत. मग अशा मंडळींनी मुख्यमंत्री व्हावे, असा टोलाही जलील यांनी मारला.

ओवेसींना विचारून पत्रक काढले
आघाडी तोडण्यासंदर्भातील पत्र मी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची परवानगी घेऊनच प्रसिद्धीस दिले. वंचितचे प्रवक्ते, नेते काहीही बोलत आहेत. विनाकारण मला ‘व्हिलन’ठरविण्यात येत आहे. आजही वंचितची मंडळी बोलणी सुरू असल्याचे सांगत आहे. पण नेमकी कोणासोबत, हे सांगावे. अलीकडेच एमआयएमला १७ जागा दिल्याची अफवा पसरविण्यात आली. हा आकडा नेमका आला कोठून हे वंचितने सांगावे.

Web Title: RSS congregation in the underprivileged !; Jalil's accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.