स्काय ब्रिज क्रिकेट लीग स्पर्धेत ‘युनायटेड क्रिकेट क्लब सी’ला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:17+5:302021-07-30T04:23:17+5:30

स्पर्धेचे बक्षीस वितरणप्रसंगी रमेश गुगळे, स्काय ब्रिजचे सिध्दांत छाजेड, सुनील गुगळे (पाथर्डी), अमित कोठारी, सुनील छाजेड, सम्यक गुंदेचा, आर्किटेक्ट ...

United Cricket Club C wins the Sky Bridge Cricket League | स्काय ब्रिज क्रिकेट लीग स्पर्धेत ‘युनायटेड क्रिकेट क्लब सी’ला विजेतेपद

स्काय ब्रिज क्रिकेट लीग स्पर्धेत ‘युनायटेड क्रिकेट क्लब सी’ला विजेतेपद

Next

स्पर्धेचे बक्षीस वितरणप्रसंगी रमेश गुगळे, स्काय ब्रिजचे सिध्दांत छाजेड, सुनील गुगळे (पाथर्डी), अमित कोठारी, सुनील छाजेड, सम्यक गुंदेचा, आर्किटेक्ट मयूर कोठारी आदी उपस्थित होते. विजेत्या संघास १५ हजार रुपये रोख व ट्रॉफी तर उपविजेत्या संघास ७७७७ रुपये रोख व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी खेळाडूंनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. मॅन ऑफ दि सिरीजचा मानकरी आकाश मुनोत याला तीन हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात आली. बेस्ट फलंदाज म्हणून केतन रपारिया तर बेस्ट गोलंदाज म्हणून शुभम मुनोत याला पुरस्कार देण्यात आला. अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार संकेत गांधी याने मिळवला. या स्पर्धेसाठी एच. यू. गुगळे, गुगळे ट्रेडर्स, चंदूकाका सराफ यांचे सहकार्य लाभले. यावेळी एच.यू. गुगळे उद्योग समूहाचे रमेश गुगळे म्हणाले, स्काय ब्रिजच्या पुढाकारातून झालेली फ्लड लाईट क्रिकेट स्पर्धा सर्वांनाच निखळ आनंद देणारी ठरली आहे. अशा स्पर्धेतून एकमेकांमध्ये एकोपा वृध्दींगत होवून खेळभावनाही वाढते.

सिध्दांत छाजेड म्हणाले की, स्काय ब्रिज गृहप्रकल्पात समावलेल्या सर्वांचे एक कुटुंब बनले आहे. एकमेकांप्रती जिव्हाळा निर्माण झाला आहे. क्रिकेट स्पर्धेत १६ संघांच्या १२० खेळाडूंनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा डालिया यांनी केले. या स्पर्धेसाठी अंकित कोठारी, आकाश मुनोत, सारंग बोरा, कुशल कांकरिया, सिध्दार्थ भंडारी, रितिका डागा, सौरभ संकलेचा, अभिषेक कोठारी, शुभम मुनोत आदींनी परिश्रम घेतले. (वा. प्र.)

--

फोटो- २८ स्काय क्रिकेट

Web Title: United Cricket Club C wins the Sky Bridge Cricket League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.