CoronaVirus News: मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांमध्ये घट; सक्रीय रुग्णसंख्याही घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 08:02 AM2022-01-16T08:02:33+5:302022-01-16T08:03:06+5:30

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ४३ दिवसांवर आला असून एक लाखांच्या पलीकडे गेलेली सक्रीय रुग्णसंख्या आता ७३,५१८ झाली आहे. 

CoronaVirus News number of corona patients decreases sigh of relief for mumbaikars | CoronaVirus News: मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांमध्ये घट; सक्रीय रुग्णसंख्याही घटली

CoronaVirus News: मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांमध्ये घट; सक्रीय रुग्णसंख्याही घटली

googlenewsNext

मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णांमधील कमालीची घट दिसून आहे. तसेच रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत शनिवारी २१,४७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १०,६६१ रुग्ण आणि ११ मृत्यूंची नोंद आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ४३ दिवसांवर आला असून एक लाखांच्या पलीकडे गेलेली सक्रीय रुग्णसंख्या आता ७३,५१८ झाली आहे. 

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के आहे. ८ ते १४ जानेवारीपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर १.५६ टक्के आहे. दिवसभरातील १० हजार रुग्णांपैकी ८,९५५ रुग्ण लक्षणविरहित आहेत, हे प्रमाण ८४ टक्के आहे. मुंबईत एकूण ९ लाख ९१ हजार ९६७ कोरोना बाधित असून मृतांचा आकडा १६ हजार ४४६ इतका आहे. झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र शून्यावर आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५८ आहे. गेल्या चोवीस तासांत रुग्णांच्या संपर्कातील ३२,५४३ अतिजोखमीच्या सहवासितांचा पालिकेने शोध घेतला.

Web Title: CoronaVirus News number of corona patients decreases sigh of relief for mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.