काम मिळविण्यासाठी कलाकारही निर्मात्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवतात, कास्टिंग काऊचवर एकता कपूरचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 12:34 PM2018-02-17T12:34:26+5:302018-02-17T12:34:46+5:30

प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने कास्टिंग काऊचवर खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

Ekta Kapoor: Actors also use their sexuality to get things done | काम मिळविण्यासाठी कलाकारही निर्मात्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवतात, कास्टिंग काऊचवर एकता कपूरचं वक्तव्य

काम मिळविण्यासाठी कलाकारही निर्मात्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवतात, कास्टिंग काऊचवर एकता कपूरचं वक्तव्य

googlenewsNext

मुंबई- प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने कास्टिंग काऊचवर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सिनेसृष्टीत अनेक निर्माते आहेत जे काम देण्याच्या नावावर कलाकारांचं लैगिंक शोषण करतात पण असेही सिनेसृष्टीत कलाकार आहेत जे काम मिळविण्यासाठी निर्मात्याबरोबर शारीरिक संबंध ठेवतात. हॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक हार्वे वाइंग्स्टनबद्दल प्रश्नावर उत्तर देताना एकता कपूरने हे विधान केलं आहे. हार्वे वाइंग्स्टनवर हॉलिवूडमधील अभिनेत्रींचं लैगिंक शोषण केल्याचा आरोप आहे. हार्वे वाइंग्स्टनबद्दलचं हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर #Metoo कॅम्पेन करण्यात आलं. नुकत्याच एका कार्यक्रमात आलेल्या एकता कपूरने हार्वेच्या प्रकरणावर वक्तव्य केलं. 

'इंडस्ट्रीमध्ये असे अनेक निर्माते आहेत जे त्यांच्या पदाचा गैरवापर करत अभिनेत्रींचं लैगिंक शोषण करतात. पण अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या कामासाठी निर्मात्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवतात. कहाणीचे दोन पैलु असतात पण लोक कधीही दुसऱ्या पैलुकडे पाहत नाहीत, असं एकता कपूरने म्हंटलं. 

एकता कपूरने म्हंटलं, इंडस्ट्रीमध्ये दोन विविध प्रकारची लोक आहेत. पावरफुल माणून नेहमी लहान किंवा उभरत्या कलाकाराचा फायदा घेतो, असं नेहमीच मानलं जातं. पण यातमध्ये खरेपणा नाही. अनेक वेळा लोक त्यांच्या कामासाठी सेक्शुअलिटीता वापर करतात. पण कुठलाही निर्माता त्याच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यात वेगळा असतो. 
 

Web Title: Ekta Kapoor: Actors also use their sexuality to get things done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.