lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea : केवळ ५ हजार गुंतवून घरीच सुरू करा Post Office, दरमहा होईल लाखोंची कमाई

Business Idea : केवळ ५ हजार गुंतवून घरीच सुरू करा Post Office, दरमहा होईल लाखोंची कमाई

पोस्ट ऑफिसच्या फ्रेन्चायझी स्कीममध्ये अगदी कमी रक्कम गुंतवून तुम्हाला चांगली रक्कम कमावण्याची संधी मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 02:54 PM2022-05-18T14:54:42+5:302022-05-18T14:58:35+5:30

पोस्ट ऑफिसच्या फ्रेन्चायझी स्कीममध्ये अगदी कमी रक्कम गुंतवून तुम्हाला चांगली रक्कम कमावण्याची संधी मिळत आहे.

india post office franchise scheme how to apply cost and monthly income profit business idea | Business Idea : केवळ ५ हजार गुंतवून घरीच सुरू करा Post Office, दरमहा होईल लाखोंची कमाई

Business Idea : केवळ ५ हजार गुंतवून घरीच सुरू करा Post Office, दरमहा होईल लाखोंची कमाई

पोस्ट ऑफिसचे (Post Office) काम केवळ पत्र किंवा वस्तू पोहोचवण्यापुरते मर्यादित नाही. मोठ्या लोकसंख्येसाठी चांगले आणि सुरक्षित रिटर्न मिळवून देण्याचंही ते एक साधन आहे. भारताचे पोस्ट ऑफिस नेटवर्क जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. भारतात सध्या सुमारे 1.55 लाख पोस्ट ऑफिसेस आहेत, परंतु त्यानंतरही अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पोस्ट ऑफिसची सुविधा सहजासहजी उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्यासाठी टपाल विभागाने पोस्ट ऑफिस फ्रेन्चायझी योजना सुरू केली आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो आणि दरमहा लाखोंची कमाई सुनिश्चित करू शकतो.

काय करू शकता काम?
पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकीत (Investment) योग्य पैसे कमावण्याची संधी मिळते. तुम्ही किमान 5 हजार रुपये खर्च करून पोस्ट ऑफिसच्या या स्कीमचा लाभ घेऊ शकता. इंडिया पोस्ट (India Post) वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्या दोन प्रकारच्या फ्रँचायझी पर्याय उपलब्ध आहेत. यातील पहिला पर्याय म्हणजे फ्रँचायझी आउटलेट सुरू करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे पोस्टल एजंट बनणे. ज्या ठिकाणी टपाल सेवेची मागणी आहे परंतु तेथे पोस्ट ऑफिस उघडणे शक्य नाही अशा ठिकाणी फ्रँचायझीद्वारे आऊटलेट्स उघडता येतात. त्याच वेळी, पोस्टल एजंट ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात टपाल तिकिटे, तसंच स्टेशनरी विकू शकतात.

काय आहे पात्रता?
कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेऊ शकतो. यासाठी आवश्यक पात्रतेमध्ये १८ वर्षे वय असणे आणि किमान ८ वी उत्तीर्ण असणे यांचा समावेश आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून आठवी उत्तीर्ण झालेली व्यक्ती पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडू शकते. यासाठी पाच हजार रुपये सिक्युरिटी म्हणून जमा करावे लागणार आहेत. तुम्ही केलेल्या कामानुसार टपाल विभाग तुम्हाला कमिशन देईल. पोस्ट ऑफिस तुमच्या परिसरात खूप दूर असेल आणि तिथल्या सेवांना मागणी असेल, तर तुम्ही कमिशनमधून दरमहा लाखो रुपये सहज कमवू शकता.

कसं कराल अप्लाय?
पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. अर्ज करण्याची लिंक इंडिया पोस्ट वेबसाइटवर दिली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी स्कीम फॉर्म डाउनलोड करू शकता. त्यानंतर फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. ज्या लोकांचे अर्ज निवडले जातील त्यांच्याशी टपाल विभाग एक करार करेल. यानंतर तुम्ही स्वतः लोकांना पोस्ट ऑफिस सेवा देऊ शकता.

Web Title: india post office franchise scheme how to apply cost and monthly income profit business idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.