Airtel ने दिली Jio ला मात; जबरदस्त स्पीडसह ग्रामीण भागात केली 5G नेटवर्कची चाचणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 01:15 PM2021-10-06T13:15:19+5:302021-10-06T13:15:30+5:30

Airtel 5G Testing: Airtel ने आपल्या 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. शहरांमध्ये टेस्टिंग केल्यानंतर कंपनीने ग्रामीण भागात देखील ही टेस्टिंग यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.  

Airtel 5g achieves 200mbps speed in rural india  | Airtel ने दिली Jio ला मात; जबरदस्त स्पीडसह ग्रामीण भागात केली 5G नेटवर्कची चाचणी  

Airtel ने दिली Jio ला मात; जबरदस्त स्पीडसह ग्रामीण भागात केली 5G नेटवर्कची चाचणी  

Next

एअरटेलने 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत कंपनीने हैद्राबादसह काही मेट्रो शहरांमध्ये 5G नेटवर्कची चाचणी केली आहे. शहरांमध्ये चाचणी पूर्ण केल्यानंतर कंपनीने आपली पाऊले गावाकडे वळवली आहेत. कंपनीने दिल्ली-NCR जवळच्या भाईपूर ब्रामनन गावात 5G नेटवर्कची यशस्वी चाचणी केल्याची माहिती दिली आहे.  

एयरटेल 5G टेस्टिंग  

टेलिकॉम विभागाने भारतातील कंपन्यांना 5G टेस्टिंगची परवानगी दली आहे. यासाठी Airtel ने Ericsson कंपनीसोबत भागेदारी केली आहे. 5G टेस्टिंगमध्ये एन्हांस मोबाईल ब्रॉडबँड आणि फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेगवान मिळवला आहे. ग्रामीण भागातील टेस्टमध्ये 3GPP कम्प्लायेंट 5G FWA डिवाइसवर कंपनीच्या इंटरनेटचा वेग 200Mbps पर्यंत पोहोचला आहे.  

एयरटेलने या टेस्टमध्ये हा स्पीड 10 किलोमीटरवर असलेल्या टॉवरवरून मिळवला आहे. व्यवसायीकरित्या उपलब्ध झाल्यावर 3GPP कम्प्लायेंट 5G स्मार्टफोनमध्ये 100Mbps पेक्षा जास्त इंटरनेट स्पीड मिळू शकतो, असे कंपनीने सांगितले आहे. विशेष म्हणजे Airtel सध्या देशात उपलब्ध असलेल्या 4G इंफ्रास्ट्रक्चरवरच 5G नेटवर्कची चाचणी करत आहे.  

Airtel 5G ठरणार गेमर्ससाठी उत्तम पर्याय 

क्लाऊड गेमिंगचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी एअटेलनं देशातील टॉप गेमर सलमान अहमद ज्याला माम्बा आणि नमन माथूर ज्याला मॉर्टल या नावानं ओळखलं जातं त्याला बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या स्मार्टफोन्सना 3500 मेगाहर्ट्स कॅपेसिटीच्या स्पेक्ट्रम बँडशी कनेक्ट करण्यात आलं. त्यांना एअरटेल 5G वर 1 GBPS पेक्षा अधिक स्पीड आणि 10 मिलीसेकंदाची लेटेन्सी मिळाली. दोघांनीही हा स्मार्टफोन गेमिंग एक्सपिरिअन्स हाय एन्ड पीसी आणि कन्सोल गेमिंगसारखा असल्याचं म्हटलं. कोणत्याही लॅगिंग शिवाय गेमिंग, लेटेन्सी आणि पिंगच्या 5G प्रत्येक गेमरचं स्वप्न बनेल आणि संपूर्ण भारतात ते लाँच होण्याची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. क्लाऊड गेमिंगद्वारे कोणत्याही अतिरिक्त हार्डवेअर शिवाय अथवा गेम डाऊनलोड करता डिजिटल बॅटलग्राउंडचा आनंद घेता येतो. 

Web Title: Airtel 5g achieves 200mbps speed in rural india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल