इन्स्टाग्रामवर आली ज्युलिया रॉबर्ट, चाहते झाले बेभान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 11:54 AM2018-06-29T11:54:41+5:302018-06-29T11:59:34+5:30

ज्युलियाने आपले अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले. ज्युलिया इन्स्टाग्रामवर आली हे कळताच, जणू धमाका झाला.

Julia Roberts officially open instagram account | इन्स्टाग्रामवर आली ज्युलिया रॉबर्ट, चाहते झाले बेभान!

इन्स्टाग्रामवर आली ज्युलिया रॉबर्ट, चाहते झाले बेभान!

googlenewsNext

हॉलिवूडचे अनेक स्टार्स आता अधिकृतपणे सोशल मीडियावर येऊ लागले आहेत. अगदी अलीकडे अँजेलिना जोली हिने अधिकृतपणे सोशल मीडियावर डेब्यू केला आणि आता हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स हिनेही फोटो शेअरिंग साईट इन्स्टाग्रामवर एन्ट्री घेतली. गत मंगळवारी ज्युलियाने आपले अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले. ज्युलिया इन्स्टाग्रामवर आली हे कळताच, जणू धमाका झाला. होय, चाहते धडाधड तिला फॉलो करत सुटले. 

 

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आत्तापर्यंत केवळ दोन पोस्ट केल्यात. पण केवळ २४ तासांत ज्युलियाच्या फॉलोअर्सचा आकडा पाच लाखांवर पोहोचला. इन्स्टाग्रामवर ज्युलियाने आपला हसतानाचा सुंदर फोटो पोस्ट केला आहे. यात तिने काळ्या रंगाचा स्वेट शर्ट घातला आहे.
ज्युलिया रॉबर्ट ही आॅस्कर विजेती अभिनेत्री आहे. पन्नासी ओलांडलेली ज्युलिया आजही तितकीच सुंदर आहे. म्हणूनच जगभरातील लोक तिच्यासाठी अक्षरश: वेडे आहेत. ज्युलियाचा फॅन क्लब आधीच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट चालवत आहे. आता ज्युलिया स्वत: इन्स्टाग्रामवर आली आहे. त्यामुळे तिच्या नवनव्या अदांनी सजलेले सुंदर फोटो आपल्याला पाहायला मिळतील,अशी आशा करूयात.
मी माझ्या चाहत्यांना प्रत्यक्ष भेटताना नर्व्हस होते. त्यांना प्रत्यक्ष भेटताना मला संकोच वाटतो. अनेकदा त्यामुळेच मी चाहत्यांना प्रत्यक्ष भेटणे टाळते,असे ज्युलियाने एका मुलाखतीत सांगितले होते. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्युलिया अप्रत्यक्ष का होईना आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहे, हेही नसे थोडके.

‘क्राईम स्टोरी’ (१९८७) या मालिकेद्वारे तिचे टीव्हीवर आगमन झाले. यामध्ये तिने एका किशोरवयीन बलात्कार पीडित मुलीची भूमिका केली होती. ज्युलियाचे मोठ्या पडद्यावर पदार्पण ‘सॅटिस्फॅक्शन’ (१९८८) या चित्रपटातून झाले. लियाम नेसन आणि जस्टिन बेटमन हे तिचे सहकलाकार होते.

 

Web Title: Julia Roberts officially open instagram account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.