पुढच्या जन्मी माझी होशील? चाहत्याने ‘मस्त मस्त’ गर्लला केले प्रपोज...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 11:37 AM2020-05-08T11:37:17+5:302020-05-08T11:39:38+5:30

रवीनाने दिले धम्माल उत्तर

when a fan put such proposal in front of raveena tandon he got a befitting reply-ram | पुढच्या जन्मी माझी होशील? चाहत्याने ‘मस्त मस्त’ गर्लला केले प्रपोज...

पुढच्या जन्मी माझी होशील? चाहत्याने ‘मस्त मस्त’ गर्लला केले प्रपोज...

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये रवीना इतर बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेच आपल्या घरी राहून त्याचे काटेकोर पालन करत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन 90 च्या दशकातील टॉपची अभिनेत्री. या ‘मस्त मस्त’ गर्लने अनेक चाहत्यांना वेड लावले. 2015 नंतर रवीना बॉलिवूड चित्रपटांमध्ये फार कमी झळकली. पण म्हणून तिची क्रेज कमी झालेली नाही. या वयातही रवीनाला लग्नासाठी प्रपोज केले जाते म्हटल्यावर या ‘मस्त मस्त’ गर्लची क्रेज किती हे तुम्ही समजू शकताच.
होय,  एका चाहत्याने 46 वर्षीय रवीनाला लग्नासाठी प्रपोज केले आणि सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली.  विशेष म्हणजे तिने सुद्धा यावर धम्माल उत्तर दिले.

काही दिवसांपूर्वीच रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला. हा फोटो तिच्या एका व्हेकेशनचा आहे. ‘उन्हाळा असह्य झाला की मी एखद्या हिल्स स्टेशनवर व्हेकेशनला जाण्याची स्वप्न बघू लागते’, असे हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले. रवीनाच्या या फोटोवर एक चाहता असा काही फिदा झाला की, त्याने तिला चक्क लग्नासाठी प्रपोज केले. रवीना मॅम पुढच्या जन्मात तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?  असे या चाहत्याने विचारले. चाहत्याच्या या कमेंटवर रवीनाने खूप मजेशीर उत्तर दिले.

आपल्या चाहत्याच्या कमेंटवर रिप्लाय करताना रवीनाने लिहिले, सॉरी यार पुढच्या 7 जन्मांसाठी मी आधीच बुक झाले आहे. यासोबत तिने एक हसणारा इमोजी सुद्धा पोस्ट केला. सोशल मीडियावर रवीनाने दिलेल्या या मजेदार उत्तरानंतर तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या मजेदार कमेंट सुद्धा पाहायला मिळत आहेत.

लॉकडाऊनमध्ये रवीना इतर बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेच आपल्या घरी राहून त्याचे काटेकोर पालन करत आहे. सध्या ती तिच्या फॅमिलीसोबत क्विलिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. यासोबतचती कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसत आहे.

Web Title: when a fan put such proposal in front of raveena tandon he got a befitting reply-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.