'द व्हॉइस'मधील स्पर्धकांना हर्षदीप कौर मानते घरातीलच सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 07:15 AM2019-02-20T07:15:00+5:302019-02-20T07:15:00+5:30

'द व्हॉइस' या कार्यक्रमात एक प्रशिक्षक म्हणून करीत असलेल्या कामाबद्दल हर्षदीप कौरचे सगळीकडून खूप कौतुक होत आहे.

Harshdeep Kaur believes the members of 'The Voice' are members of the family | 'द व्हॉइस'मधील स्पर्धकांना हर्षदीप कौर मानते घरातीलच सदस्य

'द व्हॉइस'मधील स्पर्धकांना हर्षदीप कौर मानते घरातीलच सदस्य

googlenewsNext
ठळक मुद्देहर्षदीप कौरचे सगळीकडून होतंय खूप कौतुक

स्टार प्लस वाहिनीवरील 'द व्हॉइस' या कार्यक्रमात एक प्रशिक्षक म्हणून करीत असलेल्या कामाबद्दल हर्षदीप कौरचे सगळीकडून खूप कौतुक होत आहे. अदनान सामी, कनिका कपूर आणि अरमान मलिक या अन्य प्रशिक्षकांबरोबर ती या स्पर्धकांच्या गायन कलेला पैलू पाडत असल्याबद्दल प्रेक्षकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. हर्षदीपच्या मते हे स्पर्धक  आता तिच्या कुटुंबाचाच एक भाग बनले असल्याने तिने त्यांना आपल्या घरी फराळासाठी आमंत्रित केले होते.

एका सूत्राने सांगितले, हर्षदीप या स्पर्धकांमध्ये मनाने गुंतली असून ती त्यांना आपल्या कुटुंबाचेच सदस्य मानते. या स्पर्धकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांना एक वैयक्तिक स्पर्श लाभावा यासाठी तिने त्यांना आपल्या घरी अनौपचारिक भेटीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी तिने सर्वांना खमंग भजी आणि चहा दिला. त्यानंतर त्या सर्वांनी हर्षदीपबरोबर एकत्र गाणीही गायली.


हर्षदीप कौरचा हा प्रेमळ स्वभाव आणि तिचे स्पर्धकांशी असलेले नाते यांचे प्रतिबिंब 'द व्हॉइस' या कार्यक्रमातही पाहायला दिसते आहे. या कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्यातील अतिशय गुणवान स्पर्धक यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाकडे आकर्षित होत आहेत.

'द व्हॉइस' शो शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Harshdeep Kaur believes the members of 'The Voice' are members of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.