Ganesh Utsav Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्याघरी बनवा स्वादिष्ट कलाकंद; खाणारेही म्हणतील वाह, क्या बात है

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 04:42 PM2021-09-07T16:42:59+5:302021-09-07T16:46:36+5:30

Ganesh Utsav Special Recipe : घरच्याघरी तयार केलेल्या ताज्या मिठाईची मजा काही वेगळीच असते.

Ganesh Utsav Special Recipe : How make kalakand at home for ganpati naivedya | Ganesh Utsav Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्याघरी बनवा स्वादिष्ट कलाकंद; खाणारेही म्हणतील वाह, क्या बात है

Ganesh Utsav Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्याघरी बनवा स्वादिष्ट कलाकंद; खाणारेही म्हणतील वाह, क्या बात है

Next

सण उत्सवांच्यावेळी गोड खायला सगळ्यांनाच आवडतं. बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनेक हटके पदार्थ तयार केले जातात. खासकरून दूधापासून पदार्थ तयार करण्यात येतात. बाहेरून आणलेले पेढे, मावा मोदक अनेकदा भेसळयुक्त असू शकतात. हवीतशी चव त्याची येत नाही. पण घरच्याघरी तयार केलेल्या ताज्या मिठाईची  मजा काही वेगळीच असते.

आज आम्ही तुम्हाला घरीच कलाकंद तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत. दूध आणि पनीरपासून तयार करण्यात आलेली ही मिठाई पौष्टीक, आरोग्यदायी आहेच पण चवीलाही खूप छान आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही कलाकंद अत्यंत कमी वेळात तयार करू शकता. 

साहित्य

क्रिम असलेलं दूध 

किसलेलं पनीर 

ड्रायफ्रुट्स

तूप 

वेलची 

Ganesh utsav Special Receipe 2019 : How to make kalakand at home | Ganesh Utsav Special Recipe: गणरायाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा कलाकंद!

कलाकंद तयार करण्याची कृती

१) एक कढई गॅसवर मंद आचेवर ठेवा. आता यामध्ये दूध एकत्र करा आणि काहीवेळाने त्यामध्ये किसलेलं पनीर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण चमच्याच्या मदतीने एकत्र करा. 

२) जेव्हा मिश्रण घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यामध्ये तूप एकत्र करा आणि 3 ते 4 मिनिटांसाठी गॅसवर एकत्र करत राहा. तूप व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करा. 
३) आता एका ट्रेला व्यवस्थित तूप लावून त्यामध्ये मिश्रण पसरवून घ्या. 

४) आता तुम्ही ड्राय फ्रुट्सच्या मदतीने गार्निश करू शकता. ट्रे 2 ते 3 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर बाहेर काढून त्याच्या वड्या पाडा. 

५) बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्वादिष्ट कलाकंद तयार आहेत. 

Web Title: Ganesh Utsav Special Recipe : How make kalakand at home for ganpati naivedya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.