"मी दिल्लीत आहे, फ्री असल्यास चहा प्यायला ये", IAS अधिकाऱ्याच्या ऑफरला तरुणीनं दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:48 PM2021-08-31T15:48:33+5:302021-08-31T16:04:36+5:30

IAS Lokesh Jangid: मध्य प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी लोकेश जांगिड वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी ते चहामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत.

The IAS officer offered the young woman to drink tea together | "मी दिल्लीत आहे, फ्री असल्यास चहा प्यायला ये", IAS अधिकाऱ्याच्या ऑफरला तरुणीनं दिलं असं उत्तर

"मी दिल्लीत आहे, फ्री असल्यास चहा प्यायला ये", IAS अधिकाऱ्याच्या ऑफरला तरुणीनं दिलं असं उत्तर

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी लोकेश जांगिड वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी ते चहामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. त्याचे झाले असे की, लोकेश जांगिड यांनी एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तरुणीला एकत्र चहा पिण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर या तरुणीने संबंधित मेसेज व्हायरल केला होता. तसेच ट्विट करून हे काय आहे अशी विचारणा केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी जांगिड यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (The IAS officer offered the young woman to drink tea together)

या संदर्भातील वृत्त टीवी-९ हिंदीने दिले आहे. आयएएस अधिकारी जांगिड हे एका खटल्या्च्या सुनावणीबाबत वकिलांना भेटण्यासाठी दिल्लीले गेले आहे. यादरम्यान, त्यांनी दिल्लीमधील एखा तरुणीला हा मेसेज केला होता. लोकेश जांगिड यांनी सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तरुणीला मेसेज करताना लिहिले की, हॅलो मी मध्य प्रदेशमधील आयएएस अधिकारी आहे. स्वरा भास्करच्या ट्विटर प्रोफाईलला स्क्रोल करताना मला तुमची प्रोफाईल दिसली. योगायोगाने मी आज आणि उद्या दिल्लीमध्ये आहे. मी तुमच्यासोबत चहा पिऊ इच्छितो. जर तुमच्याकडे वेळ आणि इच्छा असेल तर या. जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर गुगलवर लोकेश जांगिड आयएएस सर्च करू शकता. हा मेसेज आता तरुणीने व्हायरल केला आहे.

२०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले लोकेश जांगिड मध्य प्रदेशमध्ये राज्य शिक्षण केंद्रामध्ये अप्पर संचालक पदावर कार्यरत आहेत. यावर्षी जून महिन्यामध्ये त्यांच्या ट्रान्सफरवरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी सरकार ईणि वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मोर्चा उघडला होता. यादरम्यान एमपी आयएएश असोसिएशनने त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवरून रिमूव्ह केले होते. 

Web Title: The IAS officer offered the young woman to drink tea together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.