जिल्हा परिषद शाळेस डेस्क भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:40 AM2021-02-25T04:40:51+5:302021-02-25T04:40:51+5:30

परंडा : तालुक्यातील सक्करवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुंबई येथील उद्योजक भरत शिंदे यांनी ५० ...

Desk visit to Zilla Parishad School | जिल्हा परिषद शाळेस डेस्क भेट

जिल्हा परिषद शाळेस डेस्क भेट

googlenewsNext

परंडा : तालुक्यातील सक्करवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुंबई येथील उद्योजक भरत शिंदे यांनी ५० हजार रुपयांचे डेस्क भेट दिले.

भरत शिंदे हे करमाळा तालुक्यातील घारगावचे सुपुत्र असून, त्यांच्या बहिणीचे सासर सक्करवाडी हे आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये कोरोना प्रादुर्भावापूर्वी शिंदे हे बहिणीला भेटण्यासाठी सक्करवाडी येथे आले होते. यावेळी त्यांनी मुलांना बसण्यासाठी लाकडी डेस्क देण्याची घोषणा केली होती, पण त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन होऊन सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळा बंद झाल्या. तब्बल १ वर्षाच्या कालावधीनंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत उद्योजक भरत शिंदे यांनी सक्करवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला डेस्क भेट दिली. याच कार्यक्रमात मंगेश रघुनाथ दारूळे यांची बीएसएफमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक अमोल अंधारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Desk visit to Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.