Ganesh Chaturthi 2022: अनंत चतुर्दशी: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; २०२२ मध्ये कधी असेल गणेशोत्सव?  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:24 AM2021-09-18T11:24:58+5:302021-09-18T11:26:21+5:30

Ganesh Chaturthi 2022: सन २०२२ मध्ये गणेश चतुर्थी, गणेशोत्सव कधी असेल? जाणून घेऊया...

know about date in maharashtra of ganesh chaturthi and anant chaturdashi in 2022 | Ganesh Chaturthi 2022: अनंत चतुर्दशी: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; २०२२ मध्ये कधी असेल गणेशोत्सव?  

Ganesh Chaturthi 2022: अनंत चतुर्दशी: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; २०२२ मध्ये कधी असेल गणेशोत्सव?  

googlenewsNext

पाहता पाहता गणपती बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. कोरोनाचे संकट असूनही गणपती बाप्पाचे आगमन, पूजन यांमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. उलट कोरोनाचे सर्व नियम पाळून अगदी हर्षोल्लासात गणेशोत्सव पार पडला. दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा किंवा अगदी दहा दिवसाचा गणपती असला, तरी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त विनवणी केली जाते. सन २०२२ मध्ये गणेश चतुर्थी, गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) कधी असेल? जाणून घेऊया... (Ganesh Chaturthi 2022 Dates)

दुसऱ्यांना जमते तर मलाही जमेल, दुसऱ्यांना जमत नसेल तर मला जमवलेच पाहिजे!- गौर गोपाल दास

गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोना संकटाचे सावट होतेच. त्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क होते. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक मंडळांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते संपूर्ण उत्सव काळात समाजाने संकटाचे आणि गंभीर परिस्थितीचे भान राखले. मात्र, उत्साह किंचितही कमी होऊ दिला नाही. मात्र, गणपती बाप्पाला निरोप देताना कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळू दे आणि पुढील वर्षी तरी मोठ्या प्रमाणात नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता येऊ दे, अशीच प्रार्थना सर्वांनीच केली असेल. सन २०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यात भाद्रपद महिना सुरू होत आहे. (Ganesh Chaturthi 2022 Dates In Maharashtra)

व्रत, कुळाचार, पूजा किंवा अन्य धार्मिक कार्यात उणीव राहिल्यास पाप लागते का? शास्त्र सांगते...

भाद्रपद महिना प्रारंभ: रविवार, २८ ऑगस्ट २०२२

हरितालिका तृतीया पूजन: मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२

गणेश चतुर्थी: बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२

अनंत चतुर्दशी: शुक्रवार, ०९ सप्टेंबर २०२२

उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल शास्त्राधार घेऊन मनातील गैरसमजून दूर करूया!

गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ती पूर्वपरंपरा आजही पाळली जात आहे. चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांपलीकडील तुरीया अवस्था होय. तेच जीविताचे परमाध्य, असे मानले जाते. 
 

Web Title: know about date in maharashtra of ganesh chaturthi and anant chaturdashi in 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.