अणदूर येथे महाविकास आघाडीचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:28+5:302021-01-25T04:33:28+5:30

अणदूर : ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवित सत्ता काबीज केली. याबद्दल महाविकास ...

Mahavikas Aghadi Jallosh at Andoor | अणदूर येथे महाविकास आघाडीचा जल्लोष

अणदूर येथे महाविकास आघाडीचा जल्लोष

googlenewsNext

अणदूर : ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवित सत्ता काबीज केली. याबद्दल महाविकास आघाडीच्यावतीने येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या निवडणुकीत भाजपप्रणित जय मल्हार पॅनेल व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी पॅनेल यांच्यात चुरस होती. संपूर्ण प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. अखेर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीने जि. प. सदस्य बाबूराव चव्हाण, सुनील चव्हाण, रामचंद्र आलुरे यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १६ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व स्थापित केले. यामुळे मतदारांनी माजी मंत्री मधुकराव चव्हाण व शिक्षण महर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे दिसून येते.

विजयी उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे धनराज मुळे, डॉ नागनाथ कुंभार, सरिता मोकाशे, रामचंद्र आलुरे, देवकी चौधरी, स्नेहा मुळे बाळकृष्ण घोडके, गोदावरी गुड्ड, डॉ. जितेंद्र कानडे, उज्वला बंदपट्टे, बालाजी घुगे, जयश्री व्हटकर, मोतनबी इनामदार, डॉ विवेक बिराजदार अनुसया कांबळे, गणेश सूर्यवंशी तर जय मल्हार पॅनेलच्या एकमेव अनिता घुगरे यांचा समावेश आहे.

चौकट...

तीन डॉक्टर सत्तेत...

घुगरे या अवघ्या सात मतांनी विजयी झाल्या. शिवाय, शिवसेनेचे नेते बाळकृष्ण घोडके यांनी तीस वर्षांच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदा निवडणूक लढवून विजय प्राप्त केला. माजी सरपंच धनराज मुळे यांनी चौथ्या वेळेस निवडणूक लढवून सलग चौथा विजय संपादन केला. आलुरे गुरुजी यांचे पुतणे रामचंद्र आलुरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवित सक्रिय राजकारणात प्रवेश केला. डॉ. नागनाथ कुंभार, माजी सरपंच सरिता मोकाशे, अनुसया कांबळे, गणेश सूर्यवंशी यांनी दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला डॉ. जितेंद्र कानडे यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक केली. तीन डॉक्टर ग्रामपंचायतीच्या सत्तेत आले असून, सरपंच पदही सर्वसाधारण पुरुषासाठी सुटले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार तसेच उपसरपंचपद कोणाकडे जाणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

फोटो--- अणदूर ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सोळा जागेवर विजय मिळविल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बाबूराव चव्हाण, सुनील चव्हाण, रामचंद्र आलुरे व विजयी उमेदवार.

Web Title: Mahavikas Aghadi Jallosh at Andoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.