राज कपूर यांच्या नातवाने केला साखरपुडा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 11:34 AM2019-07-31T11:34:24+5:302019-07-31T11:34:34+5:30

राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा मुलगा अरमान जैन लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास तयार आहे.

karisma kapoor cousin armaan jain engaged to girlfriend anissa malhotra see pics | राज कपूर यांच्या नातवाने केला साखरपुडा, पाहा फोटो

राज कपूर यांच्या नातवाने केला साखरपुडा, पाहा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देअरमान हा रिमा जैन व मनोज जैन यांचा मुलगा आहे. रिमा ही ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूरची बहीण आहे.

राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा मुलगा अरमान जैन लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास तयार आहे. नुकताच अरमानने गर्लफ्रेन्ड अनीसा मल्होत्रा हिच्यासोबत साखरपुडा केला. अरमानची चुलत बहीण करिश्मा कपूरने या साखरपुड्याचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. 

आधी अरमानने एकदम रोमॅन्टिक अंदाजात अनीसाला प्रपोज केले आणि मग दोघांनीही एकमेकांना अंगठी घातली. अरमान व अनीसा दोघेही बालपणापासूनचे मित्र आहेत. 2014 मध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. त्यावेळी अरमानने याचा इन्कार केला होता. अनीसा केवळ माझी बालपणीची मैत्रिण आहे, असे त्याने सांगितले होते. अनीसा अनेकदा अरमानसोबत दिसायची. पण दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले आणि योग्य वेळ येताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अरमान हा रिमा जैन व मनोज जैन यांचा मुलगा आहे. रिमा ही ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूरची बहीण आहे.
अरमानने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम त्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर ’ आणि ‘एक मैं और एक तू’ या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. यानंतर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 2014 साली अरमानने ‘हम दीवाना दिल’ या चित्रपटामधून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरला. यानंतर अरमान कुठल्याच चित्रपटात दिसला नाही. पण करिश्मा, करीना, रणबीर यांच्यासोबत तो अनेक पार्ट्यांना दिसतो.

Web Title: karisma kapoor cousin armaan jain engaged to girlfriend anissa malhotra see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.