डिजिटल सातबारा सर्व्हरचे लवकरच खाजगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:23 AM2018-07-07T00:23:58+5:302018-07-07T00:26:07+5:30

मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, तर खान्देशातील नंदुरबार, विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यांतील डिजिटल सातबारा मिळण्यात अडचणी येत आहेत.

Soon privatization of digital satellites server | डिजिटल सातबारा सर्व्हरचे लवकरच खाजगीकरण

डिजिटल सातबारा सर्व्हरचे लवकरच खाजगीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देपाच जिल्ह्यांतील काम बंद : पुण्यातील संस्थेचे सर्व्हर तात्पुरत्या स्वरूपात वापरणार

विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, तर खान्देशातील नंदुरबार, विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यांतील डिजिटल सातबारा मिळण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून येत्या काही महिन्यांत खाजगी कंपनीकडून सर्व्हर घेण्याचा विचार शासनाने सुरू केला आहे. खाजगी संस्थेकडील सर्व्हरवरून हायस्पीडने आॅनलाईन सातबारा मिळण्याचे काम सुलभ होईल. तोपर्यंत पुण्यातील एनआयसी केंद्रावर पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सातबारा खात्यांचा डाटा स्टोअर करण्यात येणार आहे. या पाचही जिल्ह्यांतील तलाठी, मंडळ अधिका-यांची आॅनलाईन आणि आॅफलाईन कामे करताना तारांबळ उडणारच आहे. शिवाय शेतकºयांना सातबारा घेण्यासाठी ताटकळत बसावे लागणार आहे.
ई-फेरफार प्रकल्प अंमलबजावणीसाठी स्टेट डाटा सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व्हरची क्षमता व स्पेस कमी झालेली आहे, त्यामुळे सर्व्हरवर अतिरिक्त ताण पडून बिघाड होत आहे. याप्रकरणी शासनाने बैठक घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाने सर्व्हर सुविधा खाजगीकरणातून घेण्याबाबत धोरणात्मक विचार सुरू केला आहे. सध्या उपाय म्हणून वरील पाचही जिल्ह्यांतील डाटा कॉपी करून तो पुण्यातील एनडीसी येथे साठविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी खातेदारांना पीककर्ज व पीक विम्याकरिता गाव नं.७/१२ व ८ अ हे प्रमाणपत्र उपलब्ध होईल. यासाठी वरील सर्व जिल्ह्यांना एनआयसी व सिस्को खाते उघडावे लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यांकडून कर्मचाºयांचे मोबाईल क्रमांक व पासवर्ड मागविण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल सूत्रांनी दिली.
प्रकल्प समन्वयकांनी सांगितले
पाच जिल्ह्यांचे काम बंद झालेले आहे. सर्व्हरवर स्पेस (सातबारा व इतर मजूकर साठवून ठेवण्यासाठी जागा नसणे) उपलब्ध नाही, त्यामुळे त्या जिल्ह्यांचे काम बंद आहे. सर्व्हरची स्पेस उपलब्ध करून देण्यासाठी काहीही सुविधा सध्या उपलब्ध नाही. शासनाने प्रायव्हेट क्लाऊडवर हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्याला उशीर लागेल.
दरम्यान, एनआयसीचे पुण्यातील जे सेंटर आहे. तेथे डाटा पूर्ण कॉपी करून स्टोअर करण्यात येईल. सध्या एनआयसीच्या नेटवर्कनुसार काम सुरू आहे. दोन दिवसांत पुण्यातील सर्व्हर सुरू होईल. सोमवारपासून पुण्यातील सर्व्हरचे काम पूर्ण होईल. एनआयसीकडे स्पेस नसल्यामुळे ही तात्पुरती सोय आहे. काही महिन्यांतच खाजगीकरणातून स्पेस घेतली जाणार आहे, असे प्रकल्प समन्वयक रामदास जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Soon privatization of digital satellites server

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.