अर्जुन कपूर मध्यरात्री पोहचला मलायकाच्या घरी
By Admin | Published: April 24, 2016 03:06 PM2016-04-24T15:06:32+5:302016-04-24T15:06:32+5:30
अभिनेत्री मलायका अरोरा अभिनेता अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर दोघांच्या नात्यात इतका दुरावा का आला ? याबद्दल बरीच चर्चा माध्यमांमध्ये झाली होती.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अभिनेत्री मलायका अरोरा अभिनेता अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर दोघांच्या नात्यात इतका दुरावा का आला ? याबद्दल बरीच चर्चा माध्यमांमध्ये झाली होती. सतरावर्षांचे वैवाहिक नाते घटस्फोटापर्यंत पोहोचण्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रसिद्धी माध्यमांकडून झाला होता.
यात अर्जुन कपूरचे नाव समोर आले होते. अर्जुन कपूरची मलायकाबरोबर वाढलेली जवळीक या दुराव्यासाठी एक कारण असल्याचे बोलले जात होते. पण नंतर ही चर्चा विरली. आता पुन्हा एकदा या दोघांची जवळीक वाढत असल्याचे समोर आले आहे.
अर्जुनला मध्यरात्री मलायकाच्या घराजवळ पाहिल्याचे वृत्त 'स्पॉटबॉयई' या बॉलिवूडची बित्तमबातमी देणा-या संकेतस्थळाने दिले आहे. मलायका खार जिमखान्याजवळच्या तुसकॅनी इमारतीमध्ये रहाते. तिथे मध्यरात्री अर्जुन आला होता असे 'स्पॉटबॉयई' ने म्हटले आहे.
बिल्डींगमधील सूत्रांच्या सांगण्यानुसार तिथे फक्त अर्जुनच नव्हे तर, सोफी चौधरी आणि मलायकाचे अन्य मित्र-मैत्रिणी सुद्धा होत्या. अरबाजचे घर सोडल्यानंतर मलायका मुलगा अरहान सोबत इथे रहात आहे. अरबाज इथे अजून एकदाही आलेले नाही पण मलायकाची लहान बहिण अमृता अरोराचे इथे नेहमी येणे-जाणे असते.