पत्नी बाथरुममध्ये अंघोळ करताना इंजिनीयर पतीनं करंट सोडला; पोलीस चौकशीतून धक्कादायक उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 03:47 PM2021-11-16T15:47:09+5:302021-11-16T15:48:00+5:30

MP Crime News : महिलेने आरोप लावला आहे की, दुसरं लग्न करण्यासाठी इंजिनिअर पतीने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

MP : Junior engineer wife alleged husband electric current in bathroom | पत्नी बाथरुममध्ये अंघोळ करताना इंजिनीयर पतीनं करंट सोडला; पोलीस चौकशीतून धक्कादायक उलगडा

पत्नी बाथरुममध्ये अंघोळ करताना इंजिनीयर पतीनं करंट सोडला; पोलीस चौकशीतून धक्कादायक उलगडा

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime News) खरगोनमध्ये एका इंजिनिअरने पत्नीला जीवे मारण्यासाठी ती बाथरूममध्ये आंघोळ करत असताना करंट सोडला. सुदैवाने पत्नीचा जीव वाचला पण तिला गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. महिलेने आरोप लावला आहे की, दुसरं लग्न करण्यासाठी इंजिनिअर पतीने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

खरगोन शहरातील बिस्टान रोडवरील ब्रिज विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या झिरन्यामध्ये वीज कंपनीत ज्यूनिअर इंजिनिअरने दुसरं लग्न करण्यासाठी पत्नीला शॉक देऊन तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शेजाऱ्यांनी तिचा जीव वाचवला. गंभीर अवस्थेत महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. महिलेला दोन मुलं आहेत. नेहा आणि मुकेशचं  २०१३ मध्ये लग्न झालं होतं.

पीडित महिला नेहाने सांगितलं की, पती मुकेश डावर अलिकडे तिला अनेकदा मारहाण करत होता. जेवण तयार करताना तिला मारत होता. ती आंघोळीला बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी मुकेशने बाथरूममध्ये करंट सोडला आणि नळ सुरू केला. मला शॉक लागला तर मी जोरात ओरडले. आजूबाजूच्या लोकांनी मला कसंतरी बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

अॅडिशनल एसपी डॉ. नीरज चौरसिया म्हणाले की, महिलेचा जबाब घेण्यात आला आहे. महिलेने जे आरोप लावले त्याची चौकशी केली जात आहे. तसेच आरोपी फरार असून त्याला लवकरच अटक केली जाईल. 
 

Web Title: MP : Junior engineer wife alleged husband electric current in bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.