भावी सासूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलिया पॅरिसला होणार रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 10:31 AM2018-06-28T10:31:42+5:302018-06-28T10:31:55+5:30

आलियाने यावर जाहीर काहीही सांगितले नसले तरी रणबीर कपूरने एका मुलाखतीत याचा जाहीर खुलासाही केला होता. दोघे लग्नही करणार असल्याचंही बोललं जात आहे. 

Alia Bhatt also going to paris for Neetu Kapoors birthday celebration | भावी सासूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलिया पॅरिसला होणार रवाना

भावी सासूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलिया पॅरिसला होणार रवाना

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहे. आलियाने यावर जाहीर काहीही सांगितले नसले तरी रणबीर कपूरने एका मुलाखतीत याचा जाहीर खुलासाही केला होता. दोघे लग्नही करणार असल्याचंही बोललं जात आहे. 

आलिया आणि रणबीर यांचं अफेअर आता कुणापासूनही लपलं नाहीये. दोघांच्याही चाहत्यांना त्यांचं एकत्र येणंही पसंत पडलं आहे. इतकंच काय तर रणबीरच्या कुटूंबियांनाही आलिया सून म्हणून पसंत असल्याचं वेळोवेळी दिसलं आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरच्या बहिणीने आलियाला एक सुंदर गिफ्टही दिलं होतं. 

आता आलियाही एक चांगली भावी सून होण्याचा प्रयत्न आतापासून करती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीरची आई नीतू सिंग यांचा वाढदिवस जवळ आला आहे. त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनही धमाक्यात केलं जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कपूर खानदानातील कथित भावी सून आलियाही या सेलिब्रेशनमध्ये सामिल होणार आहे. इतकेच नाहीतर पॅरिसमध्ये होणाऱ्या या सेलिब्रेशनसाठी आलियाने शूटिंगमधून 3 दिवसांची सुट्टी घेतली आहे. 

रणबीर कपूरने आपल्या 'संजू' आणि 'ब्रम्हास्त्र'च्या टीमला सांगितले आहे की, तो 5 जुलैपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर जाणार आहे. तर आलियानेही 'कलंक' टीमला सांगितले आहे की, ती 6 ते 9 जुलै सुट्टीवर जाणार आहे. रणबीर आणि आलिया बुल्गेरियाहून पॅरिसला जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Alia Bhatt also going to paris for Neetu Kapoors birthday celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.