IRCTC ची शानदार ऑफर! आता Royal enfield ने  'या' ठिकाणी स्वस्तात फिरण्याची संधी    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 09:25 AM2021-09-06T09:25:15+5:302021-09-06T10:07:55+5:30

IRCTC : या पॅकेजमध्ये तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी आणि श्नोंगपेडेंगला फिरण्याची संधी मिळेल. याशिवाय, हा दौरा 6 रात्री 7 दिवसांचा असेल.

Great offer from IRCTC! Now Royal Enfield has the opportunity to travel cheaply to 'this' place | IRCTC ची शानदार ऑफर! आता Royal enfield ने  'या' ठिकाणी स्वस्तात फिरण्याची संधी    

IRCTC ची शानदार ऑफर! आता Royal enfield ने  'या' ठिकाणी स्वस्तात फिरण्याची संधी    

Next

नवी दिल्ली : जर तुम्ही मेघालयल फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी IRCTCने एक विशेष ऑफर (IRCTC Tour Package) आणली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही मेघालयल फिरू शकता आणि विशेष बाब म्हणजे तुम्हाला रॉयल एनफील्ड मोटरसायकलने प्रवास करण्याची संधी मिळत आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी आणि श्नोंगपेडेंगला फिरण्याची संधी मिळेल. याशिवाय, हा दौरा 6 रात्री 7 दिवसांचा असेल.

पॅकेजचे नाव - Enigmatic Meghalaya Adventure Package
कोणते ठिकाण - शिलाँग, चेरापुंजी आणि श्नोंगपेडेंगल (डाऊकी)
किती दिवस असेल ट्रिप - 6 रात्री /7 दिवस
ट्रिपची तारीख -13.11.2021 ते 19.11.2021
नंबर ऑफ सीट – 10
जेवणाचा प्लॅन - सर्व जेवण आणि अल्पोपाहार उपलब्ध असतील
ट्रॅव्हलिंग मोड - गुवाहाटी - शिलाँग - चेरापुंजी - शोंगपाडेंग - गुवाहाटीसाठी सेल्फ ड्राइव्ह मोटरसायकल

पॅकेजमध्ये काय मिळेल?
>> स्टॅंडर्ड कॅटगरीचे हॉटेल उपलब्ध मिळेल. तसेच, ज्याठिकाणी हॉटेल/रिसॉर्ट उपलब्ध नाही, त्याठिकाणी परमनेंट कॅंपिगची सोय असेल.
>> नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण मिळेल. यासह रिफ्रेशमेंट देखील उपलब्ध असेल.
>> चांगल्या स्थितीत रॉयल एनफील्ड मोटरसायकल इंधनासह उपलब्ध असेल.
>> याशिवाय हेल्मेट, नी गार्ड, ग्लोव्हज आणि सेफ्टी राईडिंग जॅकेट देखील मिळेल.
>> रोड ट्रिप दरम्यान बेसिक उकरणांसह, मेकॅनिकची सुविधा देखील उपलब्ध असेल.
>> प्रवासासाठी चालक आणि इंधनासह MUV बॅक अप वाहन सुद्धा मिळेल.

किती येईल खर्च?
जर तुम्ही या प्रवासात एकटे असाल तर तुम्हाला 44640 रुपये खर्च करावे लागतील. या व्यतिरिक्त, डबल ऑक्युपेसीसाठी 38320 रुपये खर्च करावे लागतील.

चेक करा ऑफिशियल लिंक
याशिवाय, या पॅकेजविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=EGH030 या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता.

Web Title: Great offer from IRCTC! Now Royal Enfield has the opportunity to travel cheaply to 'this' place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.