बेली फॅटचेही प्रकार असतात हे तुम्हाला माहित आहे का? 'हे' उपाय केल्यास पोटाची चरबी होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 05:08 PM2021-07-26T17:08:39+5:302021-07-26T17:21:36+5:30

वाढलेले वजन (weight) जितकी कठीण समस्या आहेत त्याहीपेक्षा जास्त पोटाची वाढलेली चरबी (belly fat) घटवणे कठीण आहे. पोटाची चरबी वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात. परंतु आपल्याला माहित आहे का? की पोटावरची चरबी वेगवेगळ्या प्रकारची असते. 

Did you know that there are also types of belly fat? tips to reduce belly fat | बेली फॅटचेही प्रकार असतात हे तुम्हाला माहित आहे का? 'हे' उपाय केल्यास पोटाची चरबी होईल कमी

बेली फॅटचेही प्रकार असतात हे तुम्हाला माहित आहे का? 'हे' उपाय केल्यास पोटाची चरबी होईल कमी

googlenewsNext

वाढलेले वजन (weight) जितकी कठीण समस्या आहेत त्याहीपेक्षा जास्त पोटाची वाढलेली चरबी (belly fat) घटवणे कठीण आहे. वजन वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा अनेक प्रकारचे रोग वाढवण्याचे कार्य करते. पोटाची चरबी वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात. परंतु आपल्याला माहित आहे का? की पोटावरची चरबी वेगवेगळ्या प्रकारची असते. 

स्ट्रेस बेली (stress belly)
स्ट्रेस बेली तणावामुळे निर्माण होते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनची वाढ. जेव्हा आपण सतत तणावाखाली असतो तेव्हा, शरीर जास्त प्रमाणात चरबी तयार करते. ज्यामुळे पोटावर चरबीचे थर जमा होतात. अशाप्रकारची पोटावरची चरबी कमी करण्यासाठी योगासने आणि ध्यान करा. दररोज असे केल्याने तणाव आणि नैराश्यातून मुक्त होण्यास मदत होते.

हार्मोनल बेली (harmonal belly)
हार्मोनल बेली हार्मोनल असंतुलनामुळे तयार होते. हायपोथायरॉईडीझमपासून पीसीओएस पर्यंत शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे पोटावरची चरबी वाढते. हार्मोनल चरबी कमी करण्यासाठी, हार्मोन्स नियंत्रित करणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी जीवनशैलीत बदल करा. आहारात पौष्टीक पदार्थ खा. अॅव्होकाडो, शेंगदाणे खा. वजन कमी करण्यासाठी व्यायामही करा.

लो बेली (low belly)
जर एखाद्या व्यक्तीचे शरीर जास्त जाड आहे आणि पोट कमी आहे. त्याला लो बेली असे म्हणतात. याचे प्रमुख कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. अशा व्यक्तीस बहुधा पोटा संबंधित समस्या असतात. यासाठी जास्त फायबरयुक्त पदार्थ खा. जास्त प्रमाणात पाणी प्या. या व्यतिरिक्त आहारात हिरव्या भाज्या खा. उष्मांक कमी करण्यासाठी व्यायाम करा.

पोटावरची चरबी कमी करण्याचे उपाय

  • थोडं- थोडं खा: जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल. आपला आहार ३ ते ४ भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल.
  • गरम पाणी: पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम होतात.
  • मॉर्निंग वॉक: पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करणे पोटातील चरबी करण्यासाठी योग्य उपाय आहेत. याने हळुवार फॅट्स कमी होतील आणि पचनतंत्र सुरळीत होईल.
  • नौकासन: योगाने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योगाप्रकार हा योगाचा सर्वोत्तम प्रकार आहे.
  • रात्री उशिरा जेवू नये: उशिरा डिनर करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं प्रमुख कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवून घ्यावं. किंवा रात्री काही लाइट आहार घ्या.

Web Title: Did you know that there are also types of belly fat? tips to reduce belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.