भरत जाधवचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 02:51 PM2019-04-11T14:51:53+5:302019-04-11T14:52:32+5:30

पुन्हा भरत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन.

Bharat Jadhav Stepni New Marathi Releasing Soon | भरत जाधवचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला

भरत जाधवचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

आपल्या अभिनयाने भरत जाधवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चित्रपट, रंगभूमी किंवा छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये भरत जाधवने आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्याचे पाहायला मिळत आहे. तिन्ही माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत भरतने आपल्या अभिनय कौशल्यातील अष्टपैलूत्व दाखवलं आहे. मात्र या तिन्ही माध्यमांपैकी रंगभूमीवरच भरतचं मन अधिक रमल्याने ब-याच दिवसापासून तो सिनेमापासून लांब होता.

 

आता पुन्हा भरत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. 'स्टेपनी' असे या चित्रपटाचे नाव असून भरत जाधव या चित्रपटातही  विनोदी भूमिका निभावताना दिसणार आहे. या अतरंगी नावावरूनच चित्रपटात नक्कीच वेगळे काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की आहे. आता कोणती 'स्टेपनी', कोणाची 'स्टेपनी,  अशा सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

 


भरत जाधवने यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून  विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे. आता 'स्टेपनी' या चित्रपटातून भरत जाधव पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये हशा पिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी भरत जाधव चित्रपटातून दिसणार असल्यामुळे धमाल मस्ती तर होणारच.  या चित्रपटाची निर्मिती श्री गणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी केली आहे. 

तर चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज नासीर यांनी केले असून छायांकन मुरली कृष्णा यांनी केले आहे. यासोबतच रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून राजेश एस. एस. यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. संतोष नाकट यांनी संवादाची तर देवदास भंडारे यांनी कला आणि उदय इनामती यांनी ध्वनीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाचे संकलन शशांक शाह यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Bharat Jadhav Stepni New Marathi Releasing Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.