घरच्याघरी RTPCR Test कशी करावी? टेस्टिंग किट आणाल्यावर 'अशापद्धतीने' करा टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:14 PM2022-01-17T18:14:20+5:302022-01-17T18:26:15+5:30

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने शिफारस केली आहे की, ज्यांना कोरोनाची लक्षणं जाणवतायत त्यांनी रॅपिड एंटीजन चाचणीच्या मदतीने स्वतःची घरीच कोरोना टेस्ट करावी.

how to do rtpcr test at home | घरच्याघरी RTPCR Test कशी करावी? टेस्टिंग किट आणाल्यावर 'अशापद्धतीने' करा टेस्ट

घरच्याघरी RTPCR Test कशी करावी? टेस्टिंग किट आणाल्यावर 'अशापद्धतीने' करा टेस्ट

Next

साधा सर्दी-खोकला जाणवला तरीही अनेकांच्या मनात कोरोनाची भीती दिसून येते. अनेकजण तर या भीतीने कोरोनाची चाचणीही करत नाही. मात्र इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने शिफारस केली आहे की, ज्यांना कोरोनाची लक्षणं जाणवतायत त्यांनी रॅपिड एंटीजन चाचणीच्या मदतीने स्वतःची घरीच कोरोना टेस्ट करावी.

कोविड टेस्ट किट कसं वापरावं?

  • प्रथम आपले हात स्वच्छ धुवा आणि चांगले कोरडे करा
  • स्वच्छ आणि सॅनिटाईज केलेल्या जागी बसा. तुमचं कोरोना टेस्टिंग कीट उघडा.
  • टेस्टिंग किटवर नमूद केलेलं अ‍ॅप डाउनलोड करा आणि तुमची माहिती भरा. हे काम खूप महत्त्वाचं आहे कारण असं न केल्यास कोविड रुग्णाच्या डेटामध्ये माहिती मिळणार नाही.
  • कोविड टेस्टिंग कीट उघडा आणि लक्षात ठेवा की ते उघडल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत त्याचा वापर होईल
  • प्रथम टेबलावर एक्स्ट्रक्शन ट्यूब ठेवा आणि त्यात उपस्थित लिक्विड स्थिर होईल याची वाट पहा
  • यानंतर, नाकात सुमारे २ ते ४ सेंटीमीटरपर्यंत आत नेझल स्वॅब घाला आणि पाच वेळा फिरवा.
  • नेझल स्वॅबला लिक्विडमध्ये भरलेल्या नळीत बुडवा. यानंतर बाहेरील भाग तोडून टाका आणि ट्यूब बंद करा.
  • याचा रिझल्ट तुम्हाला २० मिनिटांमध्ये येतो.
  • टेस्ट किटमध्ये, C आणि T अक्षराजवळ दोन लाईन दिसल्या याचा टेस्ट पॉझिटीव्ह आहे. C जवळ फक्त एकच लाईन दिसली तर अजिबात घाबरू नका.

 

Web Title: how to do rtpcr test at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.