आदिवासी पालकांचा कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:40 AM2017-08-24T00:40:07+5:302017-08-24T00:40:07+5:30

शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये संस्कार लक्ष्मण देशमुखे या विद्यार्थ्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया संस्थेवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पालक व नेत्यांचे शिष्टमंडळ २३ आॅगस्ट रोजी दुपारी किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडकले़ यावेळी पालकांनी कार्यालय परिसरात ठिय्या मांडला़

 Tribal Parents Stuck In The Office | आदिवासी पालकांचा कार्यालयात ठिय्या

आदिवासी पालकांचा कार्यालयात ठिय्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये संस्कार लक्ष्मण देशमुखे या विद्यार्थ्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया संस्थेवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पालक व नेत्यांचे शिष्टमंडळ २३ आॅगस्ट रोजी दुपारी किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडकले़ यावेळी पालकांनी कार्यालय परिसरात ठिय्या मांडला़
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटअंतर्गत येणाºया शंकरनगर (ता़ बिलोली) येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये संस्कार देशमुखे हा बेल्लोरी (ता़ किनवट)येथील विद्यार्थी तिसºया वर्गात शिक्षण घेत होता़ १९ आॅगस्ट रोजी या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू झाला़ त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधीक्षक, वर्गशिक्षक यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा़, प्रकल्प कार्यालयाने या शाळेतील सर्व विद्यार्थी काढून घ्यावेत व त्यांचे इतर शाळेत समायोजन करावे, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबास शासकीय सर्व मदत देण्यात यावी, या शाळेत बिगरआदिवासी व आदिवासी विद्यार्थी एकत्रित न शिकविता वेगवेगळे शिकविले जातात़ त्यामुळे शासन निर्णय व भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन होत असल्यामुळे अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा या मागण्या घेवून आदिवासी पालक व नेत्यांनी प्रकल्प कार्यालय गाठून रोष व्यक्त केला़ विविध मागण्या घेऊन आलेल्या आदिवासी पालकांना प्रकल्प अधिकारी डॉ़ विशाल राठोड यांनी प्रत्यक्ष भेटून मागण्यांचे निवेदन स्वीकारले़
आदिवासी नेते जयवंत वानोळे, माधव किरवले, गोपीनाथ बुलबुले, गंगाराम गड्डमवार, डॉ़सुभाष वानोळे, शेषराव ढोले, पं़ स़ सदस्य नीळकंठ कातले, दत्ता आडे, संजय सिडाम यांच्यासह आदिवासी पालक व नेते यांची उपस्थिती होती़
सहायक प्रकल्प अधिकारी चव्हाण, मुख्याध्यापक नागनाथ कराड, जगदाळे, जाधव यांच्यासह इतर कर्मचारी, अधिकारी यांची उपस्थिती होती़
निवेदनावर लक्ष्मण देशमुख, दत्ता लोखंडे, किसन गारोळे, काशीनाथ ढोले, राजू शेळके, नामदेव मुकाडे यांच्यासह पालक व आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत़

Web Title:  Tribal Parents Stuck In The Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.