'भाभीजी घर पर है'मध्‍ये भैया व भाभी बनले 'क्रांतिकारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:17 AM2019-08-22T11:17:31+5:302019-08-22T11:18:24+5:30

या चळवळीमध्‍ये अंगूरी, तिवारी, अनिता, विभुती, सक्‍सेना, अद्भुत सक्‍सेना, टीमटी, प्रेम आणि डॉक्‍टर असणार आहेत.

The Bhaiyas and Bhabis in &TV’s Bhabiji Ghar Par Hai turn ‘Krantikaaris’ | 'भाभीजी घर पर है'मध्‍ये भैया व भाभी बनले 'क्रांतिकारी'

'भाभीजी घर पर है'मध्‍ये भैया व भाभी बनले 'क्रांतिकारी'

googlenewsNext


'भाभीजी घर पर है'मध्‍ये एक खास स्‍वातंत्र्य दिन एपिसोड पाहायला मिळणार आहे. या एपिसोडमध्‍ये स्‍वातंत्र्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि देशभक्‍तांचा उत्‍साह दाखवण्‍यात येणार आहे. १९२०च्‍या दशकाला दाखवण्‍यासाठी संपूर्ण एपिसोड ब्‍लॅक अॅण्‍ड व्‍हाईट सिनेमॅटिक फ्रेममध्‍ये शूट करण्‍यात येणार आहे. ज्‍यामधून भारतातील ब्रिटीशांचे राज्‍य दाखवण्‍यात येणार आहे. सक्‍सेनाचे १३५ वर्षांचे पणजोबा अद्भुत सक्‍सेना हे १९२०च्‍या दशकातील स्‍वातंत्र्य सेनानी त्‍याला सरप्राईज भेट देण्‍यासह कथेला सुरूवात होईल. त्‍यानंतर क्रांतिकारी चळवळीमधील कथांची शृंखला सुरू होईल. या चळवळीमध्‍ये अंगूरी, तिवारी, अनिता, विभुती, सक्‍सेना, अद्भुत सक्‍सेना, टीमटी, प्रेम आणि डॉक्‍टर असणार आहेत. 


त्‍या युगामध्‍ये विभुती हा विक्‍टर दास असणार आहे, जो कस्‍तुरीला (अंगूरी) इंग्रजी शिकवतो. तिवारी हा अनैताला (अनिता) शिकवणारा हिंदी मास्‍टर असणार आहे. तो इंग्‍लंडमध्‍ये जन्‍मलेला होता, पण त्‍याचे भारतावर प्रेम होते. अनैताचा भाऊ रिक डोनाल्‍ड सिंग हा इंग्रज अधिकारी आहे, जो भारताचा असलेला हिरा इंग्‍लंडमध्‍ये चोरून नेण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे. रिक डोनाल्‍ड सिंग आणि त्‍याचा सहयोगी प्रेमला हिरा चोरण्‍यापासून थांबवण्‍यासाठी सर्वजण या क्रांतिकारी चळवळीमध्‍ये एकत्र येणार आहेत. वर्तमान काळाप्रमाणेच त्‍या काळात देखील आपले भैया एकमेकांच्‍या पत्‍नींवर भुरळ टाकणार आहेत. 


या खास स्‍वातंत्र्य दिन एपिसोडबाबत बोलताना आसिफ शेख म्‍हणाला, ''१५ ऑगस्‍ट या दिवसाचे ऐतिहासिक महत्‍त्‍व आहे आणि या दिवसाचे महत्‍त्‍व सांगण्‍यासाठी स्‍वातंत्र्याचा संघर्ष दाखवण्‍यासारखी उत्‍तम बाब नाही. या एपिसोड्ससाठी शूटिंग करण्‍याचा अनुभव आम्‍हा सर्वांसाठी खूपच आगळावेगळा होता. यामध्‍ये कोणतेही एकच पात्र महत्‍त्‍वाचे नव्‍हते, तर प्रत्‍येकजण महत्‍त्‍वाचा होता. माझी भूमिका हिंदी चित्रपट अभिनेता के. एन. सिंग यांचे गंभीर व्‍हर्जन आहे. प्रेक्षकांना त्‍यांचा लुक व बोलण्‍याची पद्धत दिसून येईल. आम्‍ही गतकाळातील बोलीवर देखील काम केले. क्रांतिकारीची भूमिका साकारताना आम्‍हा सर्वांमध्‍ये देशभक्‍तीचा उत्‍साह जागृत झाला. हा खास एपिसोड आवर्जून पाहा.'' 


याबाबत बोलताना सौम्‍या टंडन म्‍हणाली, ''आम्‍ही आतापर्यंत शूटिंग केलेल्‍या एपिसोड्सपैकी हे अत्‍यंत मनोरंजनपूर्ण व मजेशीर एपिसोड्स होते. मला फॉरेनरची भूमिका साकारायची असल्‍यामुळे मला ब्रिटीश भाषा बोलावी लागली. मी याचा खूप आनंद घेतला. उच्‍चार करताना मध्‍येच अडखळलो की, आम्‍ही खूप हसत होतो. मालिकेमधील माझा लुक पूर्णत: नवीन आहे. माझ्या लुकमध्‍ये लांब गाऊन, टोपी, ग्‍लोव्‍हज आणि इंग्रजी स्‍टाइलची केशभूषा आहे.  मी आशा करते की, आम्‍ही शूटिंग करताना केलेल्‍या मजेप्रमाणेच प्रेक्षक देखील एपिसोडचा आनंद घेतील.'' 

Web Title: The Bhaiyas and Bhabis in &TV’s Bhabiji Ghar Par Hai turn ‘Krantikaaris’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.