येत्या काही वर्षातच एलिअन्सना भेटू शकणार मनुष्य, नासाच्या माजी वैज्ञानिकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 01:03 PM2022-05-10T13:03:27+5:302022-05-10T13:03:46+5:30

Humans and Aliens : पुढील काही वर्षात मनुष्य एलिअन्सना भेटू शकणार. दोघांची भेट होणं निश्चित आहे. आता जिम हे अशा पदावर होते की, त्यांच्या या दाव्याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकत नाही.

Ex NASA scientist claim humans and aliens will meet in few years | येत्या काही वर्षातच एलिअन्सना भेटू शकणार मनुष्य, नासाच्या माजी वैज्ञानिकाचा दावा

येत्या काही वर्षातच एलिअन्सना भेटू शकणार मनुष्य, नासाच्या माजी वैज्ञानिकाचा दावा

Next

Humans and Aliens :  एलिअन्सबाबत जगभरात सतत नवनवे दावे केले जातात. कुणी म्हणतात एलिअन्स दुसऱ्या ग्रहावर आहेत तर कुणी म्हणतं ते पृथ्वीवर हल्ला करणार. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क तर म्हणाला होता की, एलिअन्स पृथ्वीवर मनुष्यांचं रूप धारण करून राहतात. अशात कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. पण नुकताच नासाच्या एका वैज्ञानिकान असा दावा केला की, ज्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, नासाचे (NASA Scintiest) माजी मुख्य वैज्ञानिक जिम ग्रीनने (Jim Green) एक आश्चर्यकारक दावा केला आहे. ते म्हणाले की, पुढील काही वर्षात मनुष्य एलिअन्सना भेटू शकणार. दोघांची भेट होणं निश्चित आहे. आता जिम हे अशा पदावर होते की, त्यांच्या या दाव्याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकत नाही. पण सत्य तरी कसं मानावं.

बीबीसीच्या हार्ड टॉकमध्ये आपलं मत व्यक्त करताना जिम म्हणाले की, पृथ्वीच्या बाहेर जीवन आहे. जिम यांनी नासासोबत ४० वर्षे काम केलं आणि त्यांच्या नावावरून एका एस्टेरॉइडला सुद्धा नावा देण्यात आलं. ते म्हणाले की वैज्ञानिक विज्ञानाबाबत खूप विकास करत आहेत आणि आपल्याला हे माहीत आहे की, जगात ताऱ्यांपेक्षा जास्त ग्रह आहेत.

ते असंही म्हणाले की, अनेक ग्रह अशा ठिकाणी आहेत जिथे त्यांना सूर्याचा प्रकाश मिळू शकतो आणि पाणीही असू शकतं.
ते म्हणाले की, नासा अशा ग्रहांचा वेगाने शोध घेत आहेत जिथे पाणी-अन्न असू शकतं आणि जीवनाचं अस्तित्व असू शकतं. नासाची नवीन जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ग्रहांचे चांगले फोटो घेण्यात सक्षम आहे. ज्यामुळे त्यांच्या वायुमंडळाची जास्त चांगली माहिती मिळू शकेल. जिम  म्हणाले की, या टेलिस्कोपने त्या ग्रहांच्या वायुमंडळाबाबत माहिती मिळेल आणि तो दिवस दूर नाही जेव्हा मनुष्य आणि एलिअन्सची भेट होईल. ते म्हणाले की, पुढील काही वर्षात वैज्ञानिक अनेक आश्चर्यकारक रहस्य शोधतील. 
 

Web Title: Ex NASA scientist claim humans and aliens will meet in few years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.