दुबईत चोरीला गेलेलं दिएगो मॅराडोना यांचं २० लाखांचं घड्याळ आसाममध्ये सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 02:31 PM2021-12-12T14:31:08+5:302021-12-12T14:31:43+5:30

दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना ( Diego Maradona) यांचं दुबईत चोरीला गेलेलं घड्याळ आसाममध्ये सापडलं आहे.

Football Legend Diego Maradona watch, stolen in Dubai, recovered in Assam, 1 arrested | दुबईत चोरीला गेलेलं दिएगो मॅराडोना यांचं २० लाखांचं घड्याळ आसाममध्ये सापडलं

दुबईत चोरीला गेलेलं दिएगो मॅराडोना यांचं २० लाखांचं घड्याळ आसाममध्ये सापडलं

googlenewsNext

दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना ( Diego Maradona) यांचं दुबईत चोरीला गेलेलं घड्याळ आसाममध्ये सापडलं आहे. या प्रकरणात एका व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. हे घड्याळ दुबईत चोरीला गेलं होतं आणि हब्लो ब्रँडच्या या घड्याळाची किंमत २० लाख रुपये इतकी आहे. ज्या व्यक्तिकडे पोलिसांना हे घड्याळ सापडले तो आसाम राज्याचा रहिवाशी आहे आणि तो दुबईत काम करतो. नुकताच तो भारतात परतला होता. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी सोशल मीडियावरून प्रथम माहिती दिली.

त्यांनी ट्विट केलं की,आसाम पोलिसांनी दुबई पोलिसांसोबत मिळून महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं चोरीला गेलेलं घड्याळ शोधलं. या प्रकरणी वाजिद हुसैन याला अटक केली आहे. याप्रकरणी कारयदेशीर कारवाई केली जाणार आहे.  


मॅराडोना याचं मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निधन झालं होतं. २०१०च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत मॅराडोना यांच्या हाती हे घड्याळ पाहिले गेले होते. त्याचवर्षी हब्लो कंपनीनं २५० घड्याळं लाँच केली होती आणि ती सर्व वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान विकल गेली होती.  
 

Web Title: Football Legend Diego Maradona watch, stolen in Dubai, recovered in Assam, 1 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.