सांगलीत ‘मोक्का’तील पसार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:28 AM2021-09-25T04:28:36+5:302021-09-25T04:28:36+5:30

सांगली : खून, दरोडा, मारामारीसह आठ गंभीर गुन्ह्यांसह मोक्कांतर्गत कारवाई होऊनही पसार असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली. सुरज अतुल ...

Accused arrested in Sangli 'Mocca' | सांगलीत ‘मोक्का’तील पसार आरोपीस अटक

सांगलीत ‘मोक्का’तील पसार आरोपीस अटक

googlenewsNext

सांगली : खून, दरोडा, मारामारीसह आठ गंभीर गुन्ह्यांसह मोक्कांतर्गत कारवाई होऊनही पसार असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली. सुरज अतुल पारेख (रा.श्री. अपार्टमेंट, आपटा पोलीस चौकीसमोर, सांगली) असे त्याचे नाव असून त्यास सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

जिल्ह्यातील पसार आरोपींवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना पारेखबाबत माहिती मिळाली. पोलीस कर्मचारी अनिल ऐनापुरे व अक्षय ताटे यांना माहिती मिळाली की, सुरज हा त्याच्या आजीला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार, शुक्रवारी त्यास घरातून ताब्यात घेण्यात आले.

सुरज याच्यावर विश्रामबाग, सांगली ग्रामीण आणि मिरज शहर पोलीस ठाण्यात खून, दरोडा, गर्दी मारामारी असे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो पसार होता. पोलिसांनी सांगली, कोल्हापूर, पुणे व शेजारच्या कर्नाटकातही शोध घेतला, पण तो मिळून आला नव्हता. विश्रामबागच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी केली.

Web Title: Accused arrested in Sangli 'Mocca'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.