मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:25 AM2021-09-08T08:25:18+5:302021-09-08T08:26:31+5:30

एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे

Chief Minister Bhupesh Baghel's father arrested pdc | मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना

Next
ठळक मुद्देरायपूर पाेलिसांनी नंदकुमार बघेल यांना रायपूर येथील न्यायालयात हजर केले हाेते. त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्क
रायपूर : छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील ८६ वर्षीय नंदकुमार बघेल यांना ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. 

एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. वडील म्हणून मला त्यांचा आदर असला तरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करू शतक नाही, असे सांगून मुख्यमंत्री बघेल यांनी याप्रकरणी कारवाईत हस्तक्षेप केला नाही. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. ब्राह्मण हे परकीय असून, त्यांच्यावर बहिष्कार टाका तसेच त्यांना आपल्या खेड्यांमध्ये प्रवेशही देऊ नका, असे बघेल म्हणाले हाेते. याविराेधात सर्व ब्राह्मण समाज या संघटनेच्या तक्रारीनंतर रायपूर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता. धर्म, जात, वंश, इत्यादी आधारांवर विविध समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या आराेपांखाली विविध कलमे त्यांच्यावर लावण्यात आली हाेती. 
रायपूर पाेलिसांनी नंदकुमार बघेल यांना रायपूर येथील न्यायालयात हजर केले हाेते. त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली.

Web Title: Chief Minister Bhupesh Baghel's father arrested pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.