‘सॅम्पल’च्या नावाने घेतात २ किलो तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:54 AM2018-03-18T00:54:13+5:302018-03-18T00:54:22+5:30

नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.

 Take samples in the name of 2 kg tur | ‘सॅम्पल’च्या नावाने घेतात २ किलो तूर

‘सॅम्पल’च्या नावाने घेतात २ किलो तूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.
नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी वेगवेगळे फंडे वापरुन शेतकºयांची आर्थिक लूट करण्याचा प्रकार सुरु आहे. पूर्वी खरेदी विक्री संघाकडे तूर खरेदी असतानाही गोंधळ होता. आता बाजार समितीकडे खरेदी आली तर एवढ्या दिवसांनंतर पुन्हा ओरड सुरू झाली. तूर खरेदी करत असलेल्या बारदान्याचे वजन ६०० ते ६५० ग्रॅम असल्याने ५० किलो तुरीच्या कट्यामागे ६०० किंवा ६५० ग्रॅम तूर घेणे गरजेचे असते; परंतु येथे सर्रासपणे ५० किलो ९०० ग्रॅम घेण्याचा सपाटा सुरु आहे. एका कट्ट्यामागे शेतक-यांची जवळपास २०० ते २५० ग्रॅम तूर जास्त घेतली जात आहे. अशी एका दिवसातून जेवढे क्ंिवटल तूर खरेदी होते, तेवढ्यात प्रतिक्ंिवटल अर्धाकिलो तरी जास्त माल जातो. बाजार समितीला प्रतिक्विंटल तूर खरेदीमागे एक ते दिड रुपये कमिशन नियमाने दिले जाते. याच कमिशनमधून सर्व खर्चाचे नियोजन करणे अपेक्षित असते. मात्र येथे तसे न होता तूर जास्तीची तूर घेवून शेतकºयांवरच हा भार टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. शिवाय या ठिकाणी हमाली व मापाईच्या नावाखाली ३० रुपये घेतले जात आहेत. यात हमाली १८ ते २० रुपये दिली जाते तर मापाई प्रतिक्विंटलला साडेतीन रुपये. यातून सर्व खर्च वगळता प्रतिक्विंटल ६ ते ७ रुपये जास्त घेतले जात असल्याचे म्हणने आहे. तर मुख्य बाब म्हणजे येथे ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंतच आॅनलाईन नोंदणी झालेली असली तरीही नंतर कागदपत्रे घेऊन आलेल्या शेतकºयांची नोंदणीच झालेली नसल्याचे समोर आले. अजून ८०० ते ९०० शेतकºयांची नोंद बाकी आहे.
हिंगोली : आॅनलाईन नोंदणीही वाºयावर
हिंगोलीतील बाजार समितीमध्ये तूर विक्री करण्यासाठी शेतकºयांना सर्व प्रथम आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी असेल तरच त्या शेतकºयाची तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळेच नियमाने तूर खरेदी करण्यासाठी शेतकरी कागदपत्रे घेऊन नोंदणी कक्षाजवळ जात आहेत. तर तेथे
कोणीच हजर राहत नाही. राहिलेच तर कागदपत्रे घेऊन नोंदणीविना फेकून दिले जात आहेत. त्यामुळे नोंदणी न झालेल्या शेतकºयांना पुन्हा नोंदणी करणे अडचणीचे ठरणार आहे. यावर वरिष्ठांचा अंकुशच नसल्याने हे प्रकार घडत आहेत.
वखार महामंडळाच्या गोदामात तूर नेल्यानंतर अडचण निर्माण होऊ नये म्हणून तूर खरेदी करताना तुरीचे १०० ग्रॅम सॅम्पल घेतले जाते. मात्र जास्तीचे घेतल्याची तक्रार असल्यास चौकशी करू, असे सचिव पाटील यांनी सांगितले.

Web Title:  Take samples in the name of 2 kg tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.