अरे व्वा! रस्त्याच्याकडेला बसलेल्या गरिबांना नोटांचे बंडल वाटतेय 'ही' व्यक्ती; 'हे' आहे नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:51 PM2022-01-20T15:51:26+5:302022-01-20T15:52:36+5:30

एक व्यक्ती आता चक्क रस्त्याच्याकडेला बसलेल्या गरिबांना नोटांचे बंडल वाटताना दिसत आहे.

man distributes bundles of notes to poor people sitting on the side of the road | अरे व्वा! रस्त्याच्याकडेला बसलेल्या गरिबांना नोटांचे बंडल वाटतेय 'ही' व्यक्ती; 'हे' आहे नेमकं कारण

अरे व्वा! रस्त्याच्याकडेला बसलेल्या गरिबांना नोटांचे बंडल वाटतेय 'ही' व्यक्ती; 'हे' आहे नेमकं कारण

Next

सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन व्हिडीओ हे येत असतात. अशाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा मोठा धक्का बसेल. रस्त्यावरुन चालताना अनेकदा एखादी गरीब किंवा गरजू व्यक्ती दिसते. तिला काही पैसे देऊन लोक निघून जातात. काहीजण खाण्याचे पदार्थ देतात. मात्र अशा बेघर व्यक्तीला जर कोणी नोटांचं बंडल दिल्याचं सांगितलं. तर तुमचा विश्वासच बसणार नाही किंवा ते खोटं वाटेल पण हो हे खरं आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक व्यक्ती आता चक्क रस्त्याच्याकडेला बसलेल्या गरिबांना नोटांचे बंडल वाटताना दिसत आहे. 

पीटर बॉन्ड असं या व्यक्तीचं नाव असून तो बेघरांना मदत करण्यासाठी अद्भूत असं काम करत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्यक्तीने बेघर लोकांना नोटांचं बंडल दिल्याचं पाहून अनेकजण हैराण झाले. त्याने हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला होता. जो 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. त्याने आपल्या अकाऊंटवरुन असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात तो बेघर लोकांची मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी पीटर बॉन्डच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. तर अनेकांनी तो वाटत असलेल्या पैशांवर सवाल उपस्थित केला. एकाने खरंच याला मदत करायची असेल तर त्याने टिकटॉकवर व्हिडीओ का शेअर केला असं म्हटल आहे. तर आणखी एका युजरने सांगितलं की, व्हिडीओमधून पैसे मिळाल्यानंतर तो बेघर लोकांची मदत करीत असेल. काही दिवसांपूर्वी एका क्लिपमध्ये ही व्यक्ती स्वेटपँट काढून एका बेघर व्यक्तीला देत होती. बेघर व्यक्ती डोनटच्या दुकानाबाहेर थंडीमध्ये हुडहुडत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: man distributes bundles of notes to poor people sitting on the side of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.