lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कमाल..! बुलेट बनवणाऱ्या कंपनीनं दिला 53000% चा बम्पर परतावा, 7 वरून 3700 रुपयांवर पोहोचला शेअर

कमाल..! बुलेट बनवणाऱ्या कंपनीनं दिला 53000% चा बम्पर परतावा, 7 वरून 3700 रुपयांवर पोहोचला शेअर

कंपनीच्या शेअर्चा 52 आठवड्यांतील उच्चांक 2585.30 रुपये एवढा आहे.... 1 लाखाचे झाले 5 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:12 AM2023-06-07T11:12:44+5:302023-06-07T11:15:10+5:30

कंपनीच्या शेअर्चा 52 आठवड्यांतील उच्चांक 2585.30 रुपये एवढा आहे.... 1 लाखाचे झाले 5 कोटी...

Maximum..! bullet motorcycle company gave bumper return of 53000%, share rises to Rs 3700 from Rs 7 | कमाल..! बुलेट बनवणाऱ्या कंपनीनं दिला 53000% चा बम्पर परतावा, 7 वरून 3700 रुपयांवर पोहोचला शेअर

कमाल..! बुलेट बनवणाऱ्या कंपनीनं दिला 53000% चा बम्पर परतावा, 7 वरून 3700 रुपयांवर पोहोचला शेअर

बुलेट दुचाकी तयार करणाऱ्या आयशर मोटर्सच्या शेअरने आपल्या गुतंवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. आयशर मोटर्सचा (Eicher Motors) शेअर 7 रुपयांनी वाढूनी 3700 रुपयांवर पोहोचला आहे. आयशर मोटर्सची शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळी 3886 रुपये आहे. तसेच, कंपनीच्या शेअर्चा 52 आठवड्यांतील उच्चांक 2585.30 रुपये एवढा आहे.

1 लाखाचे झाले 5 कोटी - 
आयशर मोटर्सचा (Eicher Motors) शेअर 26 जून 2002 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 6.99 रुपयांवर होता. तो 7 जून 2023 रोजी 3714.35 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत कंपनीने 53037 टक्के एवढा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 26 जून 2002 रोजी आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ही गिंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याचे 5.31 कोटी रुपये झाले असते.

केवळ 15 वर्षात शेअरनं केली कमाल - 
आयशर मोटर्सच्या शेअरने गेल्या 15 वर्षांत 13407 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 6 जून 2008 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 27.51 रुपयांवर होता. आयशर मोटर्सचा शेअर 7 जून 2023 रोजी बीएसईवर 3714.35 रुपयांवर होता. जर एखाद्यया गुंतवणूकदाराने 15 वर्षापूर्वी आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता त्याचे 1.35 कोटी रुपये झाले असते. गेल्या 10 वर्षांत आयशर मोटर्सच्या शेअरने 945 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Maximum..! bullet motorcycle company gave bumper return of 53000%, share rises to Rs 3700 from Rs 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.