चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरील कुटुंबाकडून पावणेदोन लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:23+5:302021-08-02T04:09:23+5:30

बार्शी : पाहुण्यांचा कार्यक्रम संपवून दुचाकीवरून पत्नीसह इंदापूरकडे (ता. बार्शी) येताना पाठीमागून दोन दुचाकीस्वारांनी जबर धडक देऊन खाली पाडले. ...

Fearing a knife, he looted Rs 52 lakh from the family on the two-wheeler | चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरील कुटुंबाकडून पावणेदोन लाखांचा ऐवज लुटला

चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरील कुटुंबाकडून पावणेदोन लाखांचा ऐवज लुटला

Next

बार्शी : पाहुण्यांचा कार्यक्रम संपवून दुचाकीवरून पत्नीसह इंदापूरकडे (ता. बार्शी) येताना पाठीमागून दोन दुचाकीस्वारांनी जबर धडक देऊन खाली पाडले. चाकूचा धाक दाखवून पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख असा १ लाख ७० हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

शुक्रवारी रात्री तांबेवाडी-इंदापूर रोडवर ही घटना घडली. याबाबत हनुमंत सुनील सोनवणे (२६, रा. इंदापूर) यांनी बार्शी तालुका पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील १ लाख २५ हजारांचे अडीच तोळ्यांचे गंठण, २८ हजारांची ७ ग्रॅमची कर्णफुले, १२ हजारांचे मंगळसूत्र व फिर्यादीच्या खिशातील रोख ३५०० रुपये असा पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी तांबेवाडी येथे (ता. भूम) पत्नी व मुलींसह दुचाकीवरून गेले होते. ते कार्यक्रम संपवून दुचाकीवरून रात्री इंदापूरकडे निघाले. २ किलोमीटर अंतरावर येताच पाठीमागून दोन दुचाकीस्वारांनी त्यांना धडक दिल्याने पत्नीसह खाली पडताच धडक देणा-यातील तिघांनी फिर्यादीला रस्त्याच्या कडेला चारीत ओढत नेऊन लथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड करताना गळ्याला चाकू लावून ओरडलास तर तुझ्यासह मुलीला, पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली व खिशातील साडेतीन हजारांची रोकड काढून अन्य तिघांनी दागिने हिसकावून पसार झाले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रवीण जाधव व मदतनीस पोलीस पांडुरंग सगरे करीत आहेत.

Web Title: Fearing a knife, he looted Rs 52 lakh from the family on the two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.