lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची कमाल; बाजारमुल्य 17 लाख कोटींच्या पार

Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची कमाल; बाजारमुल्य 17 लाख कोटींच्या पार

Reliance Market cap all time high: रिलायन्सने काही दिवसांपूर्वीच 16 लाख कोटींचा आकडा पार केला होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी रिलायन्सचे समभाग 2523.90 रुपयांवर पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:02 PM2021-09-27T15:02:06+5:302021-09-27T15:03:32+5:30

Reliance Market cap all time high: रिलायन्सने काही दिवसांपूर्वीच 16 लाख कोटींचा आकडा पार केला होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी रिलायन्सचे समभाग 2523.90 रुपयांवर पोहोचले.

Mukesh Ambani's Reliance Market value exceeds Rs 17 lakh crore today | Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची कमाल; बाजारमुल्य 17 लाख कोटींच्या पार

Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची कमाल; बाजारमुल्य 17 लाख कोटींच्या पार

RIL news: रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries LTD) च्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. यामुळे सोमवारी दुपारी अडीजच्या सुमारास कंपीनीचे शेअर (RIL Share Price) 1.63 टक्क्यांनी वाढून 2523.20 रुपयांवर गेले. यामुळे कंपनीचे बाजारमुल्य (RIL Market Cap) देखील कमालीचे वाढत 17 लाख कोटीं रुपयांपार गेले आहे. (Reliance Industries at life-time high; stock has surged over 25% this year)
असे करणारी रिलायन्स देशातील पहिली कंपनी बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक गॅस आणि कच्च्या तेलाचे दर वाढल्याने रिलायन्सच्या फायद्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 

Maruti 800: ...तर मारुती सुझुकी तुम्हा-आम्हाला कधी दिसली पण नसती; टाटांनीही मागितलेले लायसन

रिलायन्सने काही दिवसांपूर्वीच 16 लाख कोटींचा आकडा पार केला होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी रिलायन्सचे समभाग 2523.90 रुपयांवर पोहोचले. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीमध्येही रिलायन्सचा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये रिलायन्सच्या शेअरनी गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

Tata Group : टाटा की मुकेश अंबानींची रिलायन्स? किती विश्वासू आहेत या कंपन्या, जाणून घ्या सर्व्हेचा निकाल

RIL शेअरमध्ये वाढ होण्याची दोन कारणे आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे रिलायन्स उत्पादित करत असलेल्या कच्च्या तेलामुळे कंपनीला फायदा होण्यार आहे. तसेच नॅचरल गॅसच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. यामुळे केंद्र सरकार 1 ऑक्टोबरला गॅसच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेऊ शकते. सौदी अरामको आणि रिलायन्स डीलदेखील लवकरच मोठी बातमी देण्याची शक्यता आहे. यामुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Mukesh Ambani's Reliance Market value exceeds Rs 17 lakh crore today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.