लातुरातील साई मंदिरातील दानपेटी फाेडली, अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:42 PM2021-11-30T12:42:36+5:302021-11-30T12:42:52+5:30

Crime News: लातूर शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिरातील दानपेटी अज्ञात चाेरट्यांनी फाेडल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. चाेरट्यांनी जवळपास २५ ते ३० हजारांची राेकड पळविली आहे.

Donation box at Sai temple in Latura torn, case filed against unknown | लातुरातील साई मंदिरातील दानपेटी फाेडली, अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल

लातुरातील साई मंदिरातील दानपेटी फाेडली, अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल

Next

लातूर : शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिरातील दानपेटी अज्ञात चाेरट्यांनी फाेडल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. चाेरट्यांनी जवळपास २५ ते ३० हजारांची राेकड पळविली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नानासाहेब दिगंबरराव पाटील (५४ रा. जुना औसा राेड, संगमेश्वर साेसायटी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लातुरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिराच्या मुख्य लाकडी दरवाज्याचा कडीकाेंडा ताेडून अज्ञात चाेरट्यांनी आत प्रवेश केला.
 मंदिरातील साई मूर्ती समाेर असलेल्या स्टीलच्या दाेन दानपेट्या लाेखंडी सळईने उचकटून त्यातील भक्तांनी दान केलेली रक्कम जवळपास २५ ते ३० हजार रुपये चाेरट्यांनी पळविले. दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी पाेलिसांनी भेट देवून पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरुन अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
वाॅचमनची नजर चुकवत डल्ला
मंदिर समितीच्यावतीने सुरक्षेसाठी वाॅचमन नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, ताे आतल्या खाेलीत झाेपल्याची माहिती पाेलिसांनी दिली. 
वाॅचमनच्या हालचालींवर नजर ठेवत, त्यांची नजर चुकवत चाेरट्यांनी दाेन्ही दानपेट्यांवर डल्ला मारला आहे. 
चाेरट्यांनी दानपेट्यातील केवळ नाेटाच लंपास केल्या आहेत. तर नाण्यांना मात्र त्यांनी हात लावला नाही. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.  

मंदिर परिसरात लावलेले सीसीटीव्ही रात्री निष्क्रिय
- लातूर शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रात्रीच्या घडमाेडी, हालचाली स्पष्ट दिसून येत नसल्याने, चाेरट्यांनी मंदिरातील दाेनही दानपेट्या फाेडण्याचे धाडस केले आहे. 
- काेराेनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर नियम शिथिल करण्यात आले हाेते. परिणामी, मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत हाेती. 
- मंदिर दर्शनासाठी खुले झाले तरी दानपेट्या उघडण्यात आल्या नव्हत्या.
-  नेमकी कितीची राेकड चाेरट्यांनी पळविले, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. 

श्वान, फिंगर प्रिंट पथकाकडून पाहणी
- घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. 
- चाेरट्यांच्या शाेधासाठी पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आाहेत. एमआयडीसी पाेलिसांची व्हॅन १ ते २ वाजण्याच्या सुमारास गस्तीवर हाेती. पाेलीस आणि वाॅचमनची नजर चुकवत चाेरट्यांनी ही चाेरी केली.

 

Web Title: Donation box at Sai temple in Latura torn, case filed against unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.