गाेदामे फुल्ल; उन्हाळी धानाची खरेदी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 05:00 AM2022-05-15T05:00:00+5:302022-05-15T05:00:52+5:30

धान खरेदी करणाऱ्या संस्थांना अजूनपर्यंत बारदानाचा पुरवठा झाला नाही. १ मे ला खरेदीचा प्रारंभ करून ३० जूनपर्यंत धान खरेदी आटाेपायची हाेती. मात्र १५ दिवसांचा कालावधी हाेऊनही खरेदीला सुरूवात झाली नाही. हेच धान विकून शेतकरी खरिपासाठी आवश्यक खते, बि-बियाने खरेदी करतात. तसेच शेतीची मशागत करतात. २५ मेपर्यंत धान खरेदीला सुरूवात हाेईल असा आशावाद उपप्रादेशिक व्यवस्थापक एच. एस. सोनवाने यांनी  व्यक्त केला आहे.  

Gadame full; Waiting for summer grain purchase | गाेदामे फुल्ल; उन्हाळी धानाची खरेदी वेटिंगवर

गाेदामे फुल्ल; उन्हाळी धानाची खरेदी वेटिंगवर

googlenewsNext

प्रदीप बाेडणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड: आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून उन्हाळी हमीभाव धान खरेदीचा प्रारंभ १ मे पासून होणार होता. परंतु गाेदामे खरिपातील धानाने फुल्ल भरून आहेत. पावसाळा ताेंडावर आला असल्याने उघड्यावर धान ठेवणे धाेकादायक असल्याने धान खरेदी थांबविण्यात आली आहे. 
धान खरेदी करणाऱ्या संस्थांना अजूनपर्यंत बारदानाचा पुरवठा झाला नाही. १ मे ला खरेदीचा प्रारंभ करून ३० जूनपर्यंत धान खरेदी आटाेपायची हाेती. मात्र १५ दिवसांचा कालावधी हाेऊनही खरेदीला सुरूवात झाली नाही. हेच धान विकून शेतकरी खरिपासाठी आवश्यक खते, बि-बियाने खरेदी करतात. तसेच शेतीची मशागत करतात. २५ मेपर्यंत धान खरेदीला सुरूवात हाेईल असा आशावाद उपप्रादेशिक व्यवस्थापक एच. एस. सोनवाने यांनी  व्यक्त केला आहे.  
आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनकडून योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या संस्थांकडे धानाची विक्री करण्याकडे वाढला आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयअंतर्गत नऊ आदिवासी विविध कार्यकारी संस्था आहेत. गेल्या वर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्याने धान ओले होऊ नये म्हणून सोसायट्यांची बरीच दमछाक झाली होती.

मार्केटिंग फेडरेशनला खरेदीची मर्यादा 
-    आरमोरी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत आरमोरी, वैरागड, वडधा या गावांचा समावेश होत असून हमीभाव रब्बी धान खरेदीची मर्यादा फक्त १२ हजार क्विंटल दिली आहे. 
-    जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदीची मर्यादा वाढवून द्यावी यासाठी संस्थांचा पत्रव्यवहार सुरू असून मर्यादा वाढवली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Gadame full; Waiting for summer grain purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.