हा अभिनेता सध्या छोट्या पडद्यावर करतोय राज्य, ओळखा पाहू कोण आहे हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 07:15 AM2019-11-05T07:15:00+5:302019-11-05T07:15:03+5:30

या अभिनेत्याच्या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

Tujhyat Jeev Rangala fame hardik joshi is unrecognizable in this picture | हा अभिनेता सध्या छोट्या पडद्यावर करतोय राज्य, ओळखा पाहू कोण आहे हा?

हा अभिनेता सध्या छोट्या पडद्यावर करतोय राज्य, ओळखा पाहू कोण आहे हा?

googlenewsNext
ठळक मुद्देहार्दिक जोशी गेल्या काही वर्षांत चांगलाच बदलला आहे. त्याच्यात झालेला बदल पाहाता त्याला आता ओळखणे देखील कठीण होत आहे. हार्दिकच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर आपल्याला त्याचे अनेक जुने फोटो पाहायला मिळतात.

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता ही मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. आता प्रेक्षकांना त्यांचा लाडका राणा दा पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा दा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या मालिकेत ही भूमिका हार्दिक जोशी साकारत असून त्याला या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. हार्दिक जोशी गेल्या काही वर्षांत चांगलाच बदलला आहे. त्याच्यात झालेला बदल पाहाता त्याला आता ओळखणे देखील कठीण होत आहे. हार्दिकच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर आपल्याला त्याचे अनेक जुने फोटो पाहायला मिळतात. या फोटोतील हार्दिकला पाहून त्याच्या फॅन्सना हार्दिक इतका कसा बदलला असा प्रश्न नक्कीच पडतो. 

हार्दिक हा खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला डान्सर असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. त्याला नृत्याची आवड असल्याने त्याने अनेक चित्रपटांमध्ये साईड डान्सर म्हणून काम केले आहे. हार्दिकने तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्याआधी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच मकरंद अनासपुरेच्या रंगा पतंगा या चित्रपटात देखील त्याने काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता राणा दा या भूमिकेनेच मिळवून दिली. 

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतील रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. मालिकेत नेहमी राणा-अंजीलविरुद्ध कट-कारस्थाने करणाऱ्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब यांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही भूमिका धनश्री काडगावकरने साकारली होती. धनश्रीने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी या भूमिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

धनश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेने पाच वर्षांचा लीप घेतला असून आता या मालिकेत राणा आणि अंजलीची मुलगी राजलक्ष्मी आणि नंदिता व सुरजचा मुलगा युवराज या व्यक्तिरेखांची एंट्री झाली आहे. या मालिकेतील ही दोन्ही चिमुरडी मुले प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

Web Title: Tujhyat Jeev Rangala fame hardik joshi is unrecognizable in this picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.