भक्ती बर्वे ते अरुण सरनाईक! 'या' लोकप्रिय मराठी कलाकारांचं झालं कार अपघातात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:26 PM2022-04-12T16:26:25+5:302022-04-12T16:27:35+5:30

Marathi actors: मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांना अपघातात त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत.

अक्षय पेंडसे - आनंद अभ्यंकरांसोबत २०१२मध्ये अक्षय पेंडसेचाही मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जवळील बऊर गावाजवळ हा मोठा अपघात झाला. या अपघातात अक्षयसह त्याच्या दोन वर्षाच्या मुलाचा प्रत्युषचाही मृत्यू झाला.

आनंद अभ्यंकर - आनंद अभ्यंकर यांच्या अपघातामुळे संपूर्ण कलाविश्व हादरलं होतं. २०१२ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत अभिनेता अक्षय पेंडसेचाही मृत्यू झाला.

इश्वरी देशपांडे - पुण्यातील अभिनेत्री इश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा अपघाती मृत्यू झाला. २० सप्टेंबर रोजी गोव्यातील कलंगुट येथे गाडी खाडीत कोसळून इश्वरी आणि शुभमचा मृत्यू झाला आहे.

भक्ती बर्वे-इनामदार - असंख्य हिंदी-मराठी नाटक, मालिकांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे इनामदार. १२ फेब्रुवारी २००१ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी कार अपघातात त्यांचं निधन झालं.

अरुण सरनाईक - एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेले दिवंगत अभिनेता म्हणजे अरुण सरनाईक. १९८४ मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात त्यांचं निधन झालं.

गीता माळी - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका गीता माळी हिच कार अपघातात निधन झालं. शहापूरजवळ तिचा भीषण अपघात झाला. नाशिकला जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावर तिचा अपघात झाला आणि यात तिने तिचे प्राण गमावले.